Menu Close

जत येथील कन्नड कनिष्ठ महाविद्यालयातील पाश्‍चात्त्य दिवस साजरे न करण्याचा विद्यार्थिनींचा निर्धार !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात प्रबोधन

मार्गदर्शनाला उपस्थित विद्यार्थिनी

जत (जिल्हा सांगली) : येथील कन्नड कनिष्ठ महाविद्यालयात ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे होणार्‍या अपप्रकाराच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्राचार्य सय्यद यांना १२ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्या सौ. नीला हत्ती आणि सौ. मंदाकिनी जिगजेणी उपस्थित होत्या. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात अपप्रकार कसे रोखावेत, पाश्‍चात्त्य ‘मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे’ यांचे अनुकरण का करू नये’, याविषयी सौ. नीला हत्ती यांनी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींचे प्रबोधन केले. या वेळी सर्व विद्यार्थिनींनी आम्ही ‘मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशीप डे’ साजरा करणार नाही, असे एकमताने उत्स्फूर्तपणे सांगून तसा निर्धार केला. यानंतर प्राचार्य सय्यद यांनी ‘हे महाविद्यालय तुमचेच आहे. तुम्ही केव्हाही येऊन मार्गदर्शन करू शकता’, असे आवर्जून सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *