नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
नंदुरबार : काश्मीरमधील सैनिकांवर प्रविष्ट केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, तिरंगा यात्रेवर दगडफेक करणार्यांवर आणि देशद्रोही घोषणा देणार्यांवर कठोर कारवाई करावी या मागण्यांसाठी येथील नेताजी सुभाषबाबू चौकात १८ फेब्रुवारी या दिवशी आंदोलन करण्यात आले. देशाच्या सीमेवर दिवसरात्र लढणार्या सैनिकांवर काश्मीरमध्ये प्रविष्ट केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलना’च्या माध्यमातून या वेळी करण्यात आली. या आंदोलनाच्या वेळी कासगंज जिल्ह्यातील ‘तिरंगा यात्रे’वर धर्मांधांनी केलेली दगडफेक, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा आणि तिरंग्याचा केलेला अवमान, तसेच अभाविपच्या चंदन गुप्ता यांची झालेली हत्या यांचा निषेध करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात