कोपरगावचे शहर पोलीस निरीक्षक पारेकर यांचे तडकाफडकी स्थानांतर
गोवंशहत्या बंदीच्या कायद्याची कार्यवाही तर सोडाच; उलट त्यासाठी कार्यरत असणार्या पोलिसांवर कारवाई होऊन त्यांचे खच्चीकरण होत राहिले, तर अशाने राज्यातील गोवंशियांच्या हत्या कधी तरी थांबतील काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोपरगाव (नाशिक) : येथील अवैधरित्या चालणार्या पशूवधगृहावर १३ फेब्रुवारीला टाकण्यात आलेल्या धाडीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाने शहर पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले, तसेच शहर पोलीस ठाण्यातील मुख्य हवालदार मच्छिंंद्र सातपुते, नंदकिशोर काटे आणि रशीद शेख यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. (असे का झाले, या संदर्भात सखोल चौकशी होऊन ते जनतेसमोर येणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या कारवाईत गोवंशियांचे मांस, जिवंत गायी, जनावरांची कातडी, चरबी, चरबीपासून बनवलेले तूप आणि अन्य साहित्य मिळून जवळपास १ कोटीहून अधिक माल जप्त करण्यात आला. आतापर्यंत या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हे प्रविष्ट करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात