शिवपुरी वाटिका (वाराणसी, उत्तरप्रदेश) येथे हिंदु धर्मजागृती सभा
वाराणसी : आज देशामध्ये भ्रष्टाचार, बलात्कार, महागाई, गोहत्या, धर्म परिवर्तन, आतंकवाद, लव्ह जिहाद यांसारख्या समस्या वाढत आहेत, तसेच शत्रू राष्ट्राकडून सातत्याने होणार्या आक्रमणांमुळे देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत. या सर्व समस्यांना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय सिंह यांनी केले. येथील बडागावमधील गाँगकला बाजार भागामध्ये असलेल्या शिवपुरी वाटिका येथे समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये श्री. सिंह ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
वैशिष्ट्यपूर्ण
शिवपुरी वाटिकाचे मालक श्री. राधेश्याम गुप्ता यांनी सभेसाठी सभागृह निःशुल्क उपलब्ध करून दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात