Menu Close

धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे ! – मोहन गौडा

कर्नाटकमधील श्री अर्धनारीश्‍वरन् क्षेत्र इंदबेट्टु येथे हिंदु धर्मजागृती सभा

सभेला उपस्थित धर्माभिमानी हिंदू

बेळ्तंगडी-इंदबेट्टु (कर्नाटक) : धर्मनिरपेक्ष संविधानाच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय करण्यात येत आहे. राज्यात हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍यांची निर्घृण हत्या करण्यात येत आहे. हिंदूंचे मठ आणि मंदिरे कह्यात घेण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक सणांवर बंदी घालण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे, तसेच अन्य पंथियांच्या उत्सवाच्या कारणाखाली ‘हनुमान जयंती’वर बंदी घालण्यात येत आहे. धर्मावरील हे आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी श्री अर्धनारीश्‍वरन् क्षेत्र इंदबेट्टु येथील हिंदु धर्मजागृती सभेत केले. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक श्री. चंद्र मोगेर आणि सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै या उपस्थित होत्या. सभेच्या प्रारंभी शंखनाद आणि वेदमंत्रपठण करण्यात आले. समितीच्या कार्याची माहिती श्री. चंद्र मोगेर यांनी उपस्थितांना करून दिली. सभेचे सूत्रसंचालन कु. चेतना आणि कु. रश्मी यांनी केले. सभेला ३५० धर्मप्रेमी उपस्थित होते.

समाजातील व्यक्तींना धर्माचरणाचे महत्त्व सांगणे अत्यंत आवश्यक ! – सौ. लक्ष्मी पै

आजच्या मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीमुळे भारतीय संस्कृतीची अवनती होत आहे. पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे आपण आपल्या श्रेष्ठ हिंदु संस्कृतीला विसरत आहोत. आपण सर्वजण स्वतः धर्माचरण करून समाजातील व्यक्तींना धर्माचरणाचे महत्त्व सांगणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण

१. सभेनंतर झालेल्या आढाव्याला अनुमाने २७० हून अधिक जण उपस्थित होते.

२. सभेला येतांना अनेक धर्मप्रेमी दुचाकीला भगवे ध्वज लावून घोषणा देत येत होते.

३. धर्मप्रेमींनी स्वतःहून पुढाकार घेत वाहनफेरीचे आयोजन केले होते.

४. स्थानिक धर्मप्रेमी संघटनांनी सभेचा प्रसार आणि सभागृह सिद्धता अशा अनेक सेवेत उत्साहाने सहभाग घेतला.

५. या वेळी लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *