Menu Close

‘सिमी’च्या कारवायांना साहाय्य करणार्‍या फारुख शेखला घोषित झालेला सरकारचा पुरस्कार स्थगित

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधाचा परिणाम !

हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केला नसता, तर सरकारने स्वत:हून ही कारवाई केली असती का, हा प्रश्‍न आहे ! असे असंवेदनशील सरकार आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई काय करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

जळगाव : ‘सिमी’च्या कारवायांना साहाय्य करणारा संशयित धर्मांध फारुख शेख यांना राज्य सरकारचा ‘शिवछत्रपती क्रीडा संघटक – कार्यकर्ता’ पुरस्कार घोषित झाला होता. याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी आवाज उठवून सरकारला निवेदन दिले होते. यामुळे हा पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे. चारित्र्य पडताळणी अहवाल संदिग्ध असल्याच्या कारणावरून हा पुरस्कार स्थगित करण्यात येत असल्याची माहिती क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाने दिली आहे. (यापूर्वी फारूख शेख यांच्या चारित्र्याची पडताळणी केली नव्हती का ? कि करूनही त्याकडे दुर्लक्ष केले ? त्या सर्व संबंधितांवरही कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

‘शिवछत्रपती क्रीडा संघटक – कार्यकर्ता’ पुरस्कार वर्ष २०१४-१५ साठी ‘जैन स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी’चे क्रीडा समन्वयक फारुख शेख यांना घोषित झाला होता; परंतु हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यास विरोध दर्शवला होता. अखेर क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाने शेख यांचा ७ नोव्हेंबर २०१७ चा पोलीस प्रशासनाकडील चारित्र्य पडताळणी अहवाल संदिग्ध असल्याचे कारण सांगून ‘याविषयी चौकशी केल्यानंतरच पुरस्कार देणे योग्य ठरेल’, असे सांगितले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला याविषयी आदेश प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *