इंदूर (मध्यप्रदेश) : येथील महाराजा यशवंतराव रुग्णालयाचे प्राध्यापक डॉ. सलील भार्गव यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी डॉ. सलील भार्गव यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने चालू असलेल्या संशोधन कार्याविषयी अवगत केले. विश्वविद्यालयाच्या कार्याविषयी डॉ. भार्गव यांनी प्रशंसा केली आणि त्यामध्ये स्वतः सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली. या भेटीमध्ये उभयतांमध्ये साधना, अध्यात्म, रोगनिवारण हेतू नामजप आदी विविध विषयांवर चर्चा झाली.
या वेळी डॉ. भार्गव यांनी त्यांचे मित्र डॉ. सुमेर सिंह यांची सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना ओळख करून दिली. या प्रसंगी डॉ. सुमेर सिंह यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांसाठी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्याविषयी इच्छा प्रदर्शित केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात