हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांचा सातारा दौरा !
सातारा : हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी सातारा आणि कराड येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, पत्रकार अन् कृतीशील हिंदुत्वनिष्ठ यांच्या भेटी घेतल्या. या वेळी हिंदूसंघटन, राष्ट्रीय हिंदू अधिवेशन यांसह संघटनात्मक गोष्टींविषयी सकारात्मक चर्चा झाली. त्याचा वृत्तांत !
सनातनच्या निरपराध साधकांना जामीन मिळाल्याने सनातनचे कार्य अधिकच उजळून निघाले ! – कराड येथील धर्मप्रेमी
आपल्या हिंदुत्वाच्या कार्यास तोड नाही. खोट्या आरोपाखाली अटक केलेल्या धर्मप्रेमी साधकांना जामीन मिळाल्याने सनातनचे कार्य अधिकच उजळून निघाले आहे, असे कराड येथील शिवराज ढाब्याचे मालक श्री. नामदेव थोरात यांनी सांगितले. या वेळी माऊली मंडपचे मालक श्री. गोरख (बापू) करपे आणि उद्योजक श्री. गीतन गुंदेशा उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीचे कार्य अतिशय व्यापक ! – श्री. राजेंद्र चोरगे, विश्वस्त, गुरुकुल स्कूल आणि बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा
सद्यकाळात संस्कृतीचे रक्षण होणे आवश्यक आहे. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांना समितीने केलेल्या ध्वनीचित्र-चकती दाखवणार आहे. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उभारलेल्या माहुली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांविषयी धर्मशिक्षण देणारे फलक लावणार. हिंदु जनजागृती समितीचे कार्य अतिशय व्यापक स्तरावर चालू आहे.
सनातन आणि समिती यांच्याविषयी कृतज्ञतेसाठी आमच्याकडे शब्दच नाहीत ! – श्री. सतीश केसकर, जिल्हाध्यक्ष, योग वेदांत सेवा समिती, सातारा
राष्ट्र-धर्म विषयक विचार गावागावांत पोहोचवण्यासाठी संघटित कृती करूया. पूज्यपाद संतश्री आसारामबापूजींच्या कार्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी जे सहकार्य केले आहे, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत.
समितीचे कार्य आवश्यकच ! – श्री. राजेंद्र घनवट, सातारा
हिंदु जनजागृती समितीचे कार्य सद्यकाळात आवश्यक आहे. आपणांस सदैव सहकार्य राहील. यापुढे धर्मकार्यात अधिकाधिक प्रत्यक्ष योगदान देणार. तसेच त्यादृष्टीने उद्योजक शिबिरात सहभागी होणार आहे.
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी होणार ! – श्री. विनायकराव पावसकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, कराड
लव्ह जिहाद जनजागृती मोर्चा काढून हिंदूंमध्ये जागृती करणे, तसेच हिंदूंचे धर्मांतर रोखणे आवश्यक आहे. समान नागरी कायदा होण्यासाठी हिंदू एकता आंदोलन कटिबद्ध आहे. हिंदु जनजागृती समिती करत असलेले हिंदुत्वरक्षणाचे कार्य चांगले आहे. येत्या अखिल भारतीय राष्ट्रीय हिंदू अधिवेशनात मी सहभागी होणार आहे.
धर्माविषयीच्या कार्याची सध्या आवश्यकता ! – डॉ. जयवंत चव्हाण, सातारा
सामाजिक संकेतस्थळातून पसरवले जाणारे हिंदु धर्माविषयीचे अपसमज, तसेच मंदिरात चालणारे अपप्रकार पहाता सध्याच्या काळात अधिक कार्य करण्याची आवश्यकता वाटते. चर्चेतून पुढील कार्याची दिशा आणि साधना करण्याचे महत्त्व लक्षात आले. विचारांची देवाणघेवाण झाल्यावर हलके वाटले.
सनातन आणि समिती यांचे राष्ट्र अन् धर्म यांविषयीचे कार्य गतीने वाढतच आहे ! – श्री. रामभाऊ जगताप, पत्रकार, महाराष्ट्र टाईम्स, कराड
पत्रकार म्हणून राष्ट्रकार्यात सर्वप्रकारे साहाय्य करीन. आपण भेटायला आलात, याविषयी कृतज्ञ आहे. राजकीय हेतूने अनेक आरोप होऊनही आपले राष्ट्र आणि धर्मविषयीचे कार्य गतीने वाढतच आहे, याविषयी आनंद वाटतो. पत्रकारितेसंबंधीच्या उपक्रमात अवश्य सहभागी होईन.
कृतीशील हिंदुत्वनिष्ठांना सामूहिक मार्गदर्शन !
राष्ट्र आणि धर्महानी रोखण्यासाठी म्हणजेच हिंदुहित साधण्यासाठी जात-पात-पक्ष विरहित संघटन निर्माण करणे, हा प्रभावी उपाय आहे. संघटन झाले, तरच अन्यायाविरुद्ध खडसवता येईल, प्रतिकार करता येईल. हे कार्य करतांना ईश्वरप्राप्तीसाठी दैनंदिन प्रयत्न म्हणजेच साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन श्री. मनोज खाडये यांनी केले.
कराड येथील मार्गदर्शनास हिंदू एकता आंदोलन आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान या संघटनांचे २० कार्यकर्ते आणि सातारा येथे योग वेदांत सेवा समितीच्या केंद्रात आयोजित केलेल्या मार्गदर्शनास योग वेदांत सेवा समिती, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि विश्व हिंदू परिषद या संघटनांचे १६ कार्यकर्ते उपस्थित होते. युवकांनी धर्मकार्य करतांना येणार्या समस्यांचे निरसन करून घेतले, तसेच संघटितपणे कार्य करण्याचा निश्चय केला.
क्षणचित्रे
१. श्री. मनोज खाडये यांनी हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र का हवे हा ग्रंथ, राष्ट्रीय हिंदू अधिवेशनाची ध्वनीचित्र-चकती आणि सनातन प्रभातचे विशेषांक भेट दिले.
२. स्वदेशी अभियानाचे श्री. विकास चव्हाण, उद्योजक श्री. सतीश सारडा आणि सनातन प्रभातचे वाचक श्री. मोहन शिंदे यांनी धर्मकार्यात साहाय्य करण्याचा मनोदय व्यक्त केला.
३. संपर्कानंतर शिवराज ढाब्याचे मालक श्री. नामदेव थोरात यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले.
हिंदू अधिवेशनास येण्यास उत्सुक हिंदुत्वनिष्ठ
श्री. नामदेव थोरात, श्री. गोरख (बापू) करपे, श्री. गीतन गुंदेशा, श्री. राजेंद्र घनवट आणि डॉ. जयवंत चव्हाण
सनातन आश्रमास सहपरिवार भेट देण्याची इच्छा व्यक्त केलेले हिंदुत्वनिष्ठ
श्री. राजेंद्र चोरगे, श्री. राजेंद्र घनवट आणि श्री. चंदन जाधव
हिंदूंनो, राष्ट्र-धर्मकार्यात आपापल्या परीने योगदान देणे म्हणजे राष्ट्र आणि धर्म कर्तव्य बजावणेच होय !
हिंदु धर्मजागृती सभा, आढावा बैठका, चर्चा, भेटी यांद्वारे विचारमंथन होऊन राष्ट्र आणि धर्म कार्यार्थ कृतीशील होणारे धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांच्या संघटनात्मक प्रयत्नांना ईश्वर निश्चितच यश देईल !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात