‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन
गोरखपूर : येथील सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. प्रफुल्ल सिंह यांनी ‘नॉरमॅन’ परिसरात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, या विषयावर प्रवचन आयोजित केले होते. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मनुष्यजन्माचे ध्येय, जीवनातील साधनेचे महत्त्व आणि नामसाधना या विषयांवर मार्गदर्शन केले. या वेळी जिज्ञासूंनी सनातनच्या ग्रंथसंपदेचा लाभ घेतला.
महंत रवींद्र दासजी यांना सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे निमंत्रण
गोरखपूर : आंतरराष्ट्रीय सीताराम बँकेचे संचालक, तसेच संकटमोचन कालीबाडी मंदिराचे महंत रवींद्र दासजी यांना सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी आमंत्रित करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी महंत रवींद्र दासजी यांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याची दिशा समजावून सांगितली. महंत रवींद्र दासजी यांनी हिंदू अधिवेशनाला येण्याविषयी आश्वस्त केले. महंत रवींद्र दासजी हे येथील गोरक्षपिठाचे विद्यमान महंत योगी आदित्यनाथ यांचे गुरुबंधू असून ते ‘हिंदु युवा वाहिनी’चे मार्गदर्शक आहेत. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश-बिहार समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी हे उपस्थित होते.
बडहलगंज (उत्तरप्रदेश) येथे हिंदूसंघटन बैठक
बडहलगंज : येथील विचित्रवीर हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री. शंभूनाथ त्रिपाठी यांनी हिंदूसंघटन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत बडहलगंज परिसरातील सुशिक्षित आणि धार्मिक लोक सहभागी झाले होते. सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी बैठकीत ‘वर्तमानस्थितीत हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’, या विषयावर उपस्थितांचे उद्बोधन कले. बैठकीच्या आरंभी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख श्री. वसंत सणस यांनी करून दिली, तर या धर्मकार्यात ग्रामस्थांनी सहभागी होण्याविषयी श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी आवाहन केले. या बैठकीत मासिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्चित झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात