Menu Close

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली सदिच्छा भेट

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (डावीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना कु. प्रियांका लोणे

श्रीरामपूर : मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या प्रखर धर्मनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीक्षेत्र देवगड संस्थान, जिल्हा नगर येथे सदिच्छा भेट घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर, नगर आणि जालना जिल्ह्यांच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी साध्वीजींचा हार आणि शाल घालून सन्मान केला. तसेच त्यांना ‘मालेगांव बमविस्फोट के पीछे का अदृश्य हाथ’ हा ग्रंथ आणि हिंदी पाक्षिक सनातन प्रभात भेट दिला. या वेळी श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे प.पू. भास्करगिरीजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. त्याचप्रमाणे नेवासा येथील गोरक्षक श्री. संतोष पंडुरे, विहिंपचे तालुका संयोजक श्री. गजानन गवारे, विहिंपचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख श्री. विश्‍वनाथ नाणेकर, संभाजीनगर येथील गोरक्षक चंदाताई रजपूत, तसेच भोपाळ येथील हिंदुत्वनिष्ठ भगवान झा यांच्यासह बजरंग दल आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *