पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ४ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या सभेला २ सहस्र हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते. सभेनंतरच्या आढावा बैठकीला गावातील ४० धर्माभिमानी उपस्थित होते. त्यांच्या चर्चेतील अनुभव येथे देत आहोत.
१. सनातनच्या साधकांना हिंदु धर्मजागृती सभेच्या निमंत्रणाची उद्घोषणा करतांना धमकावणारे धर्मांध !
हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यासाठी सनातनचे एक साधक रिक्शाद्वारे उद्घोषणा देत एका मशिदीजवळ पोहोचले. तेव्हा तेथील मुसलमानांनी त्यांना उद्घोषणा बंद करण्यास सांगितले; परंतु त्या साधकांनी तसे करण्यास विरोध दर्शवला. त्यावर मुसलमान तरुण म्हणाला, ‘‘चल, आम्ही काही लोकांना घेऊन येतो, तू तिथे ये.’’ त्यानंतर साधक रिक्शा घेऊन बराच वेळ त्या जागेवर थांबले; परंतु तिथे कोणीही आले नाही.
२. मशिदीच्या रस्त्यावरून हिंदूंच्या सवाद्य मिरवणुकीला बंदी असणे आणि धर्मजागृती सभेनंतर त्याविषयी कोणीही न हटकणे
पाळधी गावाच्या मुख्य रस्त्याला लागून एक मशीद आहे. पूर्वी येथून जी पायी पंढरपूर वारी जात होती, तेव्हाही हिंदूंना वाद्य वाजवण्यास बंदी केली जात होती; परंतु हिंदु धर्मजागृती सभेनंतर आता यात पालट झाला आहे. या रस्त्यावरून आता सवाद्य मिरवणूक जाते, तरीही कोणी हटकत नाही.
३. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी प्रतिवर्षी सभेचे आयोजन करण्यास सांगणे आणि साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवणे !
गावातील काही प्रतिष्ठित नागरिक म्हणाले, ‘‘अशा सभेचे आयोजन प्रतिवर्षी न चुकता करायला हवे, त्यास जर काही आर्थिक साहाय्य लागत असेल, तर आम्ही गावातून ती गोळा करून देऊ.’’
४. हिंदु धर्मजागृती सभेनंतर गावातील तरुणांमध्ये उत्साह येऊन ते कृतीशील होणे !
पाळधी येथील हिंदु धर्मजागृती सभेनंतर गावातील तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सभेनंतर महाशिवरात्रीविषयीचे धर्मशिक्षण देणारे फलक, भित्तीपत्रके, सात्त्विक ग्रंथांचे प्रदर्शन लावणे, समाजप्रबोधनार्थ निवेदन देणे यांसारख्या कृतींचे दायित्व त्यांनी स्वत:हून मागून घेतले.
(म्हणे) ‘हिंदु धर्मजागृती सभेनंतर गावातील वातावरण बिघडले !’
- हिंदु धर्मजागृती सभेनंतर सर्वत्र सकारात्मक वातावरण असतांना राजकारणी मानसिकता असणार्या एका पक्ष कार्यकर्त्याची प्रतिक्रिया !
- मुसलमानांचे लांगूलचालन म्हणजे चांगले वातावरण आणि हिंदूंनी त्यांचे हक्क मागितले की, खराब वातावरण असे समजणार्या पक्षांकडून दुसरी काय अपेक्षा करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
गावातील वातावरण पूर्वी पुष्कळ चांगले होते, लोक गुण्यागोविंदाने रहात होते; मात्र सभेनंतर तुम्ही हे वातावरण बिघडवले. गावात उद्या जर काही घडले, तर आम्ही मध्यस्थी करणार नाही, तुम्हालाच ते पहावे लागेल.
– एक पक्ष कार्यकर्ता
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात