देहली येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
देहली : जम्मू-काश्मीरमध्ये शोपियां येथे देशद्रोह्यांनी दगडफेक करून सैनिकांवर आक्रमण केले. यात आत्मसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात २ देशद्रोही ठार झाले. यात सैन्याची काहीच चूक नाही. त्यामुळे सीमेवर रात्रंदिवस लढणार्या सैनिकांवर गुन्हा प्रविष्ट करणे म्हणजे देशद्रोहाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. त्यामुळे सैन्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ फेब्रुवारी या दिवशी येथील संसद मार्गावर आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’द्वारे करण्यात आली.
क्षणचित्रे
आंदोलन चालू झाल्यानंतर ३० मिनिटांनी पोलिसांनी येऊन आंदोलन थांबवण्याची लिखित सूचना दिली. त्यामुळे अर्ध्यावरच आंदोलन थांबवावे लागले. (राष्ट्र आणि धर्म यांसाठी नि:स्वार्थीपणे कार्य करणार्या हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनावर निर्बंध आणणार्या पोलिसांनी असे निर्बंध कधी अन्य पंथियांच्या आंदोलनांवर लादले आहेत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात