राऊरकेला (ओडिशा) येथे योग वेदांत सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजन दिन’ साजरा
राऊरकेला (ओडिशा) : गुरु-शिष्य, पिता-पुत्र, बहीण-भाऊ, पती-पत्नी अशा अनेक पवित्र नात्यांचे संस्कार जपणार्या भारतीय संस्कृतीमध्ये आज पाश्चात्त्य विकृत परंपरा फोफावत आहेत. आजची युवा पिढी पाश्चात्त्यांच्या ‘डे’ संस्कृतीच्या अधीन होऊन विकृत होत आहे. संतश्री आसारामजी बापूंनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विकृतीला ‘मातृ-पितृ पूजन दिन’ हा पवित्र पर्याय समाजाला देऊन एक आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी केले. योग वेदांत सेवा समितीद्वारा येथील मिलन ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या ‘मातृ-पितृ पूजन दिन’ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
या वेळी वेदव्यास येथील प.पू. ब्रह्मसाक्षात्कारी सरस्वती महाराज, ‘पुरुषोत्तम इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी’चे कुलसचिव श्री. बरदा प्रसाद, ऋषिकेश रे कॉलेजचे प्राचार्य श्री. भावेश चंद्र साहू यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात २०० हून अधिक मुलांनी पालकांसह सहभाग घेतला होता. योग वेदांत सेवा समितीचे सचिव श्री. समीर पटनाईक यांनी उपस्थित मुलांकडून ‘मातृ-पितृ पूजन’ करवून घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात