Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मध्यप्रदेशातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी यांना मार्गदर्शन

ढाबा (जि. मंदसौर) येथे हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करतांना (१) सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

इंदूर : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना कृतीशील व्हाव्यात, तसेच त्यांच्यात परस्पर समन्वय निर्माण व्हावा, यांसाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ५ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत मध्यप्रदेशातील इंदूर, धार, रतलाम, मंदसौर या जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी यांच्याशी संपर्क केला. या वेळी समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे आणि श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते.

इंदूर येथे आर्य समाजाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा

इंदूर येथील आर्य समाजाचे प्रमुख श्री. दक्षदेव गौड आणि विचारवंत डॉ. अखिलेशचंद्र शर्मा यांची सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी भेट घेतली. या वेळी तरुणांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले.

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची भेट

सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी इंदूर येथील अधिवक्ता नीलेश चौधरी आणि अधिवक्ता देवेंद्र पेंडसे यांची भेट घेतली. अधिवक्ता चौधरी यांनी ‘या धर्मरक्षणाच्या कार्यात अन्य अधिवक्त्यांना जोडण्यासाठी प्रयत्न करीन’, असे सांगितले.

धार येथे अखिल भारतीय हिंदु महासभेच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत मार्गदर्शन

धार येथे सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी अखिल भारतीय हिंदु महासभेच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्री. जितेंद्रसिंह ठाकूर उपस्थित होते.

मंदसौर

मंदसौर येथील सुप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिरामध्ये सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी श्रीराम युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांना ‘धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्र यांसाठी संघटित प्रयत्न’ या विषयांवर मार्गदर्शन केले.

मंदसौर जिल्ह्यातील गरोठ येथे श्री. रामदयालजी आर्य यांच्याशी चर्चा

मंदसौर जिल्ह्यातील गरोठ येथे सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी येथील प्रतिष्ठित आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. रामदयालजी आर्य यांची भेट घेतली अन् धर्मरक्षणाच्या कार्यात येणार्‍या अडचणी, साधना, अध्यात्म आदी विषयांवर चर्चा केली. तसेच सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी ढाबा येथे बंजारा समाजाच्या युवकांना साधना, धर्मशिक्षण, संघटन आदी विषयांवर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा २५ युवकांनी लाभ घेतला.

श्यामगड येथे युवकांना मार्गदर्शन

सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी श्यामगड येथील हनुमान मंदिरात ‘धर्माचरणाचे महत्त्व आणि साधना’ आदी विषयांवर युवकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. राजवीर परमार यांनी केले होते.

रतलाम येथे हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते आणि विद्यार्थी यांची भेट

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची भेट

रतलाम येथे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी अधिवक्ता आशिष खंडेलवाल आणि अधिवक्ता योगेश शर्मा यांची भेट घेतली. या वेळी या दोन्ही अधिवक्त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली. अधिवक्ता शर्मा यांनी त्यांच्या भागातील मंदिरात धर्मशिक्षण फलक लावण्याची सिद्धता दर्शवली.

महापौर श्रीमती डॉ. सुनीता यार्दे यांच्याशी भेट

सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी रतलामच्या महापौर डॉ. सुनीता यार्दे आणि त्यांचे पती श्री. यार्दे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी धर्माची बिकट स्थिती पालटण्यासाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या प्रयत्नांची त्यांना माहिती देण्यात आली.

आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी चर्चा

सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी रतलाम येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या वेळी २० विद्यार्थी उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन श्री. दीपकसिंह ठाकूर यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. हरिष खंडेलवाल यांनी त्यांच्या परिचितांसमवेत एका बैठकीचे आयोजन केले.

अखिल भारतीय हिंदु महासभा आणि शिवसेना गोरक्षण न्यास यांच्या पदाधिकार्‍यांशी बैठक

रतलाम येथे सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी अखिल भारतीय हिंदु महासभा आणि शिवसेना गोरक्षण न्यास या संघटनांच्या पदाधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत धर्मरक्षणासाठी कराव्याच्या विविध प्रयत्नांविषयी चर्चा करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *