क्रांतिकारकाचे लावलेले प्रदर्शन
ऐरोली (नवी मुंबई) : श्री रौद्रशंभो प्रतिष्ठानच्या वतीने ऐरोली, सेक्टर १६ येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने दुचाकी फेरी आणि शोभायात्रा काढण्यात आली होती. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचा लाभ नागरिकांनी घेतला. संध्याकाळी शिवपालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दाखवण्यात आलेली लाठीकाठीची प्रात्याक्षिके मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरली.
क्षणचित्रे
१. स्थानिकांनी ठिकठिकाणी मिरवणुकीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या होत्या.
२. क्रांतिकारकाचे लावलेले प्रदर्शन लोक थांबून वाचत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात