रामनाथ (अलिबाग) : येथे २० फेब्रुवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण देणार्या मदरशांवर बंदी घालावी, भारतीय अधिकार्यांवर दगडफेक करून त्यांचे मनोबल खच्चीकरण करणार्या देशद्रोह्यांवर कठोर कारवाई करावी, या मागण्या या वेळी करण्यात आल्या. आंदोलनात सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद, ब्राह्मण सेवा संघ, शिवसेना, आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष सहभागी झाले होते.
अधिवक्ता श्री. श्रीराम ठोसर, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री – न्यायासाठी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. पांडवांप्रमाणे सर्व हिंदूंनी एकत्रित येऊन कृती केली पाहिजे.
धर्माभिमानी श्री. गिरीश जोशी – काश्मीरमध्ये योग्य वेळी निर्णय घेतला असता, तर आज ही परिस्थिती नसती. अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीच आघात न रोखल्यास आपले भविष्य अंधःकारमय असेल.
सनातन संस्थेचे श्री. जांभळे गुरुजी – धर्मासाठी सर्व हिंदू एकत्र येऊन त्याग करतील, तेव्हाच त्यांचे जीवन सार्थकी लागेल.
राष्ट्रप्रेमींच्या मागण्यांचे निवेदन येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. भरत शितोळे यांना देण्यात आले. या वेळी अधिवक्ता श्री. श्रीराम ठोसर, श्री. देवदत्त जोगळेकर, ब्राह्मण सेवा संघाचे श्री. आदित्य दातार, तसेच धर्मप्रेमी श्री. प्रतीक पाटील, शिवसेना विभाग प्रमुख वावे येथील श्री. संदीप पाडेकर उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
श्री. देवदत्त जोगळेकर यांच्याकडे वास्तुविशारद येणार होते; परंतु श्री. जोगळेकर यांनी त्यांचे येणे रहित करून पूर्ण वेळ आंदोलनाला उपस्थित राहिले.
क्षणचित्रे
१. धर्मप्रेमी श्री. आतिश शिंदे याने महाविद्यालयात प्रबोधन करून युवक आणि युवती यांना आंदोलनाला येण्यासाठी प्रवृत्त केले.
२. आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. रवी आंबेकर यांना बाहेरगावी जायचे असतांनाही ते थोडा वेळ आंदोलनाला उपस्थित राहिले.
३. धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनीच आंदोलनाची पूर्वसिद्धता केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात