बेळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेत शेकडो हिंदूंच्या साक्षीने हिंदु राष्ट्र स्थापनेची ललकारी !
बेळगाव : कर्नाटक सरकार करोडो रुपये चर्च आणि मशिदी बांधण्यासाठी तसेच चर्च आणि मशिदीच्या नूतनीकरणासाठी सन २०१३-१४ पर्यंत देत आहे. हे अनधिकृत आणि भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. कर्नाटक सरकार प्रत्येक मासाला ४ सहस्र रुपये इमाम आणि ३ सहस्र रुपये मशिदीचे मौलवी यांना मानधन म्हणून देते; पण सरकार एक रुपयाही हिंदूंच्या देवळातील पुजार्याला मानधन म्हणून देत नाही. गेल्या ५ वर्षांत २० हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या; मात्र सत्ताधारी पक्षाच्या हस्तक्षेपामुळे अजूनही अपराध्यांना शिक्षा झाली नाही. अशा वेळी हिंदूंनी जात, संप्रदाय यांच्या मर्यादा ओलांडून ‘हिंदू’ म्हणून एक येऊन देशविरोधी शक्तींपासून देशाचे रक्षण केले पाहिजे, असे आवाहन हिंदू विधीज्ञ परिषदचे कर्नाटक राज्य समन्वयक अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर यांनी केले. ते २० फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता महांत भवन, महांतेश नगर येथे कन्नड भाषिकांसाठी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. या वेळी २५० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
या सभेत हिंदु जनजागृती समितीचे धारवाड जिल्हा समितीचे समन्वयक श्री. व्यंकटरमण नाईक आणि सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदमूर्ती वासुदेव पांडुरंग छत्रे गुरुजी आणि त्यांचे सहकारी यांनी वेदमंत्रपठण केले. सभेत हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा कु. सरिता मुगळी यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी केले.
या वेळी बोलतांना अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर पुढे म्हणाले की,
१. राज्य पोलिसांनी सावधानतेची चेतावणी देऊनही कर्नाटक सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या १४०० धर्मांध दंगलखोरांच्या विरोधात असणारे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेतल्याने, सामाजिक मालमत्तेची हानी करणार्या आणि पोलीस अधिकार्यांवरच प्राणघातक शस्त्रांनी आक्रमण करणार्या अशा अपराध्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
२. कर्नाटक सरकारने सत्तेमध्ये आल्यापासून अनधिकृत लाभ घेण्यासाठी आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी लोकायुक्त संस्थेला कमकुवत केले आहे.
३. सत्तेवर असणार्या राज्यकर्त्यांच्या दबावामुळे उप पोलीस अधीक्षक एम्.के. गणपती आणि आय.पी.एस्. अधिकारी डी.के. रवी यांनी आत्महत्या केल्याची तसेच उप पोलीस अधीक्षक अनुपमा शेणॉय यांनी राजीनामा दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत; मात्र आरोपी मोकाट फिरत आहेत.
४. गोहत्या बंदीचा कायदा अस्तित्वात असूनही मोठ्या राजकीय नेत्यांच्या छत्रछायेखाली राज्यात गोहत्या राजरोसपणे चालू आहेत.
५. ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या एका जागतिक संस्थेने केलेल्या पाहणीनुसार कर्नाटक राज्य भ्रष्टाचारामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे आढळून आले आहे.
६. देशातील ८ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत; मात्र त्यांना अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या सुविधा मिळत नाहीत, तर मुसलमान आणि ख्रिस्ती काही राज्यांमध्ये बहुसंख्य असूनही ते अल्पसंख्यांकांच्या सुविधा उपभोगत आहेत. हा हिंदूंवरील अन्यायच आहे.
समाजातील दृष्ट प्रवृतींचे निर्मूलन करून उत्तम समाजाच्या निर्माणासाठी हिंदु राष्ट्र स्थापना अपरिहार्य ! – व्यंकटरमण नाईक, हिंदु जनजागृती समिती
रामराज्यामध्ये प्रजा धर्माचरणी असल्यामुळे प्रजा सात्त्विक होती. आता धर्माचरण करून पाश्चात्त्य संस्कृतीचा त्याग करून धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्राची स्थापना करायला हवी. यांसाठी क्षात्रतेजासमवेत ब्राह्मतेजाची आवश्यकता आहे. ब्राह्मतेजासाठी साधना हाच मार्ग आहे आणि असे केल्यानेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.
गुलामगिरी मानसिकतेने ग्रस्त असलेले हिंदूच आज हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राचा विरोध करीत आहेत ! – विदुला हळदीपूर, सनातन संस्था
भारतीय समाजात २ विचारधारा आहेत. एक हिंदु राष्ट्राचे समर्थन करणारी आणि दुसरी त्याला विरोध करणारी. हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी विदेशी आक्रमणे, तसेच गुलामगिरी मानसिकतेने ग्रस्त असलेले हिंदूच आज हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राचा विरोध करीत आहेत. स्वतःला आधुनिकतावादी आणि बुद्धीवादी म्हणून घेणार्या वैचारिक आतंकवादी विचारधारेमुळे हिंदूंच्या श्रद्धांवर मोठा आघात होत आहे.
क्षणचित्रे
१. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.
२. सभास्थळी क्रांतीकारकांची यशोगाथा आणि धर्माचरण महत्त्व विषद करण्यासाठी बालचमूंनी क्रांतीकारक आणि पारंपारिक वेशभूषा परिधान केलेला कक्ष उभारण्यात आला होता. याद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत होते.
३. सभास्थळी सनातन संस्था प्रकाशित विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचा वितरण कक्ष, तसेच क्रांतीकारक आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
आभार
प्रज्वल डेकोरेटर्स, प्रभू साऊंडस, मणीकांत डेकोरेटर्स यांचे आभार मानण्यात आले.
‘मारव्हलस बेलगाम’ यांच्या फेसबूक पानावरून सभेचे थेट प्रक्षेपण !
असे हिंदुत्वनिष्ठ सर्वत्र हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बेळगाव येथील प्रखर राष्ट्रनिष्ठ हिंदु धर्माभिमानी श्री. राकेश नंदगडकर यांनी ‘मारव्हलस गामबेल’ या त्यांच्या फेसबूक पानावरून सभा ‘लाईव्ह शेअर’ केली. ‘मारव्हलस गामबेल’च्या फेसबूक पानाचे ८६ सहस्रांहून अधिक अनुयायी (फॉलोअर्स) आहेत.
सभेनंतरच्या आढावा बैठकीत उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांनी आढावा बैठकीत हिंदु राष्ट्राची संकल्पना जाणून घेतली. या वेळी हिंदु धर्मातील वेगवेगळ्या प्रवाहांना एकत्र करण्यासाठी कृती करण्याची, तसेच हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. या वेळी हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे आणि हिंदु धर्मावरील प्रवाहांमधील मतभेद नष्ट व्हावे यांसाठी धर्मशिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार. तसेच धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची सिद्धता धर्मप्रेमींनी दर्शवली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात