Menu Close

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलन करतांना कार्यकर्ते

वर्धा : येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या वेळी सैनिकांवर प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, तसेच मदरशांतून केल्या जाणार्‍या देशविरोधी कारवायांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी यांसह अन्य राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भातील मागण्याही करण्यात आल्या. आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख, प्राध्यापक श्री. अतुल शेंडे, राम मंदिराचे कोषाध्यक्ष श्री. संजीव हरदास, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर वर्धा तहसीलदार श्री. निवृत्ती ऊईके यांना निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *