नारायणचिंचोली, ता. पंढरपूर येथे हिंदु धर्मजागृती सभा
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : छत्रपती शिवाजी महाराजांनी ३६५ दिवस पराक्रम केला आहे. त्यामुळे केवळ १९ फेब्रुवारी नव्हे, तर प्रतिदिनच शिवप्रतापाचे स्मरण करून शिवछत्रपतींचे गुण अंगीकारणे आवश्यक आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर होणार्या आघातांविरोधात लढण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित व्हा, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आणि राजे ग्रुप नारायणचिंचोली यांनी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेला १०० धर्माभिमानी उपस्थित होते.
नारायणचिंचोलीचे माजी सरपंच श्री. लक्ष्मण (तात्या) कोले यांनी अधिवक्ता सांगोलकर यांचा सत्कार केला. या वेळी उपसभापती श्री. लक्ष्मण (तात्या) धनवडे उपस्थित होते. दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मुकुंद घाडगे यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिली. उपस्थित मान्यवरांसह सूर्यनारायण मंदिराचे पुजारी आवताडे, एकमतचे पत्रकार मारूती वाघमोडे, छत्रपती शिवाजी महाराज (राजेग्रुप) चे अध्यक्ष, तसेच ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल माने, धर्माभिमानी सर्वश्री अभिजित कवडे, किशोर कवडे, राहुल मलपे, प्रमोद गुंड, शिवाजी गुंड यांनी धर्मसभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात