विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मुख्याधिकार्यांना निवेदनाद्वारे मागणी
पंढरपूर : येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की,
१. चंद्रभागा नदीमध्ये रस्त्यावरील ड्रेनेज अनेक वेळा भरून ते मैलामिश्रीत पाणी थेट घाटावरून नदीत मिसळते याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे.
२. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणार्या मटण मार्केटमधील मांसमिश्रीत पाणी नाल्याद्वारे नदीत मिसळले जाते, तेच पाणी भाविक तीर्थ म्हणून पितात, हा भाविकांच्या श्रद्धेशी खेळ नव्हे का ?
३. जुन्या सरकारी रुग्णालयासमोरून जाणारी थेट चंद्रभागेच्या पात्रात निघणारी बदबदी ही जुन्या काळातील पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था आहे. या बदबदीस गावातील अनेक सांडपाण्याचे नाले जोडल्यामुळे हे घाण पाणी नदीच्या पात्रात जाते. ते नाले ड्रेनेज लाईनला जोडावेत.
४. वरील समस्या नदीचे पाणी दूषित आणि पावित्र्य नष्ट करणार्या आहेत, तसेच अवैध वाळू उपसा, संतांच्या समाधींची पडझड, स्नानासाठी बंधार्यातून योग्य पाणी नियोजन केले जात नाही, नियमित पात्रातील कचर्याचे संकलन केले जात नाही, या सर्व समस्यांवर कठोर पावले उचलावित अन्यथा संघटनांना तीव्र आंदोलन करण्याविना पर्याय नाही.
निवेदन देणार्या संघटना
हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद, सनातन संस्था, वारकरी संप्रदाय पाईक संघ, हिंदु महासभा, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, महर्षी वाल्मिकी संघ, पेशवा युवा मंच, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, परशुराम युवा मंच, धाडस प्रतिष्ठान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान पंढरपूर, श्री संकल्प युवा प्रतिष्ठान, विश्व वारकरी सेना, राष्ट्रीय नाभिक महासंघ, दुनियादारी फौंडेशन, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात