प्रकाशा, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे शिवजयंतीच्या निमित्ताने व्याख्यान
नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला ३ वर्षांपासून असलेली लाखांची फौज ३ दिवसांत घेऊन पळून जायला भाग पाडले, अशा छत्रपतींचा आदर्श हिंदूंनी घ्यायला हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. ते प्रकाशा येथील भैरव चौकात आयोजित व्याख्यानाच्या वेळी बोलत होते. या व्याख्यानाचा १६० धर्माभिमान्यांनी लाभ घेतला.
या वेळी डॉ. नरेंद्र पाटील पुढे म्हणाले…
१. छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरांंचे रक्षण केले, तर आज मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे. भक्तांकडून आलेल्या निधीवर शासन डोळा ठेवत आहे.
२. त्याकाळी हेरखाते सक्षम होते, तर देश आज आतंकवाद्यांनी पोखरला आहे.
३. महाराजांना आपण ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणतो. गोहत्या करणार्या कसायाचे त्यांनी हात छाटले; परंतु आज देशात प्रतिदिन गोहत्या चालू आहेत.
४. त्याकाळी महिला सुरक्षित होती, तर आज लव्ह जिहाद सारख्या घटना नित्याने घडत आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे.
५. त्याकाळी समाज एकसंघ होता, आज मात्र तो जाती-जातींत विखुरला आहे.
६. महाराजांनी मंदिरे पाडून मशिदी उभारलेल्या जागी पुन्हा मशिदी पाडून मंदिरे उभी केली. आज मात्र देवळे पाडली जात आहेत, त्यातील मूर्तींचे भंजन होत आहे.
७. धर्मांतराचा फतवा काढणार्या ४ पाद्य्रांचे शिर धडावेगळे केले, आज मात्र भारतात प्रतिवर्षी १२ लक्ष हिंदूंचे धर्मांतर होत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात