- क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या चित्राचा फलक लावण्यास अनुमती आणि हिंदूंचा शौर्यशाली इतिहास सांगणारा फलक लावण्यास बंदी घालायला धुळे काय पाकिस्तानात आहे काय ?
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच शौर्याचे चित्र लावण्यास विरोध होतो, हे सरकारला लज्जास्पद ! ही मोगलाई संपुष्टात येण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
धुळे : अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील आग्रा रोडवरील फुलवाला चौकात शिवजयंतीच्या निमित्ताने ‘अफझलखानवधा’च्या चित्राचा फलक लावण्यास हिंदुत्वनिष्ठांना विरोध केला. प्रत्यक्षात या फलकाला इतर कोणीही विरोध केलेला नाही. (अफझलखानवधाच्या चित्रावरून अन्य धर्मीय काही म्हणत नसतांना पोलिसांना पोटशूळ का उठतो ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते शहरात फलक लावण्यास घेऊन जात असतांनाच त्यांना पोलिसांनी हटकले. या वेळी कार्यकर्त्याने पोलिसांना उद्देशून म्हटले की,‘हा हिंदूंचा शौर्यशाली अन् सत्य इतिहास आहे. तो हिंदूंसमोर मांडणे आवश्यक आहे.’ यावर पोलीस म्हणाले, ‘तुमचा इतिहास आणि तुम्हाला काय शिकवायचे ते घरात शिकवा. त्याला बाहेर आणण्याची आवश्यकता नाही.’ (असे अन्य धर्मियांना सांगण्याचे धाडस हे पोलीस दाखवतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) गेल्या मासात येथील पोलीस ठाण्याला लागूनच ‘टिपू सुलतान’च्या चित्राचा फलक लावण्यात आला होता. (अन्य धर्मियांच्या भावनांना कुरवाळायचे आणि हिंदूंच्या धर्मभावनांना पायदळी तुडवायचे, हाच का ‘सर्वधर्मसमभाव’ ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात