Menu Close

सोमालियामध्ये २ चारचाकी वाहनांत बॉम्बस्फोट

१८ जण ठार, २० घायाळ

सोमालिया : राजधानी मोगादिशू येथे राष्ट्रपती भवनजवळ आणि एका हॉटेलसमोर अशा २ ठिकाणी दोन चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत १८ जणांचा जागीच मृत्यू, तर २० जण घायाळ झाले आहेत. घायाळांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे, अशी माहिती पोलीस कॅप्टन महंमद हुसैन यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

सरकारने एक दिवस आधीच आतंकवादी आक्रमणाची चेतावणी दिली होती आणि लगेचच दुसर्‍या दिवशी हे दोन स्फोट झाले. ‘अल् कायदा’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित ‘अल्-शबाब’ या आतंकवादी संघटनेने या स्फोटाचे दायित्व  स्वीकारले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि डिसेंबर २०१७ मध्येही याच आतंकवादी संघटनेने आक्रमण केले होते. त्यात अनुक्रमे ५१२ नागरिक आणि १८ पोलीस यांचा मृत्यू झाला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

  1. Sanjay Bhagat

    Agnes Gonxha Bojaxhiu or Mother Teresa was deployed by the Vatican church(POPE) to convert poor people to christianity in Indian and were funded by the vatican. This has been practiced by the western countries since long and she clicked..

  2. purvi rawal

    I’m very happy about this website. I do hope the popularity increases though. We need more and more Hindus to be aware of facts. Blasphemy seems to be the new trend with certain sects of Hindu society.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *