सोलापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
सोलापूर : ‘देशामध्ये मदरशांतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी अतिरेकी कारवायांमध्ये अग्रेसर आहेत’, असे वक्तव्य नुकतेच शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केले. हीच गोष्ट गेली कित्येक वर्षे आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून सांगत आहोत. मदरशांना दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करून त्यांची चौकशी करा, तसेच मदरशांच्या ट्रस्टींच्या पार्श्वभूमीची चौकशी करा, अशी मागणी येथील भाजपचे (पक्ष) माजी नगरसेवक आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. बापू ढगे यांनी केली. येथील जिल्हा परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार येथे २१ फेब्रुवारीला झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते.
श्री. ढगे पुढे म्हणाले की, मदरशांतून देशद्रोही कारवाया केल्या जातात, तसेच तेथे शैक्षणिक क्षेत्रातील कायदे पाळले जात नाहीत. ‘वन्दे मातरम्’ किंवा ‘राष्ट्रगीत’ यांचा तेथे अवमानच केला जातो. भविष्यात या देशात भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे.
प्रशासनाने निर्णायक पावले उचलून चंदन गुप्ता यांच्या मारेकर्यांवर कारवाई करावी ! – अभय कुलथे, गोरक्षक
‘अभाविप’चे कार्यकर्ते चंदन गुप्ता यांची गोळ्या घालून हत्या केली. अशा आक्रमणांमुळे हिंदू घाबरणार नाहीत. प्रशासनाने यावर निर्णायक पावले उचलून चंदन गुप्ता यांच्या मारेकर्यांवर कारवाई करावी. याचसमवेत भारतात ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणून घोषणा दिल्यावर आक्रमण करणारे पाकिस्तानी आहेत कि आतंकवादी, हे सरकारने शोधून काढावे.
देशाचे रक्षण करतांना देशद्रोह्यांवर कारवाई करायची नाही का ? – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद
कायद्याचे रक्षण अल्पसंख्यांकांना मिळते आणि हिंदूंवर मात्र कायद्यांचा धाक दाखवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. काश्मीर येथे सैन्याने आत्मरक्षणासाठी केलेल्या कारवाईच्या वेळी दगडफेक करणारे दोन देशद्रोही मारले गेले; म्हणून सैन्यावर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले. देशाचे रक्षण करतांना देशद्रोह्यांवर कारवाई करायची नाही; तर मग कोणती कृती करणे सरकारला अपेक्षित आहे ?
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे आणि सनातन संस्थेच्या सौ. अनिता बुणगे यांनीही मनोगत व्यक्त केले.
उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
सर्वश्री शिवशंकर अजनाळकर, विठ्ठल नोरा, सागर अतनुरे, अक्षय अंजीखाने, तिरुमल श्रीराम, सिद्धराम पुजारी, किशोर रायचुरकर, विजय गोरकल, शिवकुमार पुजारी, राजेश पांचाळ, श्रीराम सेनेचे सिद्धराम नंदर्गी यांसह मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
क्षणचित्र
आंदोलनानंतर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद सलगर (सर), श्री. मुरलीकृष्ण गुडेल, गोरक्षक अभय कुलथे, समितीचे विनोद रसाळ यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय तेली यांना आंदोलनातील मागण्यांचे निवेदन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात