विटा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
विटा : एकीकडे भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्या ९,७३० देशद्रोह्यांवरील गुन्हे काश्मीर सरकार मागे घेते आणि दुसरीकडे सैन्याने आत्मरक्षणासाठी केलेल्या कारवाईच्या वेळी दोन दगडफेक करणारे देशद्रोही मारले गेले, म्हणून सैन्यावर गुन्हे प्रविष्ट केले जातात, हे अतिशय दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात सुरक्षादलाच्या ताफ्यातील ४ वाहनांवर दगडफेक करून आक्रमण करणार्या ३०० जणांवर कारवाई न करता जमावाला पांगवण्यासाठी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात २ दगडफेक करणार्या देशद्रोह्यांचा मृत्यू झाला, यात काही चुकीचे झाले नाही. देशाच्या सीमेवर दिवसरात्र लढणार्या सैनिकांवर गुन्हा नोंदवणे, ही घटना देशद्रोह्यांना प्रोत्साहन देणारी आणि सैन्याचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे. काश्मीरमध्ये सैनिकांवर प्रविष्ट केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कदम यांनी केले. ते २२ फेब्रुवारी या दिवशी पाटील पेट्रोल पंपासमोर झालेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त बोलत होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. वैद्या कु. शिल्पा बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी सिंहसेना संस्थापक श्री. शिव शिंदे, श्री. अमर शिंदे, कडेगाव येथील धर्मप्रेमी, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांसह २५ हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
क्षणचित्र
या वेळी आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एका मोठ्या पोलीस गाडीसह १५ पोलीस बंदोबस्तासाठी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
माढा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी नायब तहसीलदारांना निवेदन
माढा (जिल्हा सोलापूर) : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार पी.बी. मोरे यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री सागर धर्मे, सिद्धार्थ लटके, शंभूराजे हिंगमिरे, तेजस राऊत, संदीप राऊत, वैभव पाटील, प्रशांत धर्मे, मनीष लटके, भाऊ शिंदे, महादेव लटके, शंकर जाधव, राजेंद्र उन्हाळे, विक्रम घोडके आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात