सर्वत्रच्या मंदिरांमध्ये वारंवार होणार्या चोर्या रोखण्यासाठी शासनकर्ते आणि पोलीस कोणतीही ठोस उपाययोजना काढत नसल्यामुळेच चोर्यांचे प्रमाण सर्वत्र वाढले आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सांगली : ऐतिहासिक प्राचीन आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हरिपूरच्या बागेतील श्री गणेश मंदिरात मध्यरात्री चोरी झाली आहे. चोरांनी गाभार्याच्या लोखंडी द्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर चोरांनी लोखंडी तिजोरीतील चांदीचे किरीट, अभिषेक पात्र, तांब्या, ताम्हन, चांदीचा उंदिर यांसह अन्य असे ४ किलो ७०० ग्राम चांदीचे दागिने आणि पूजासाहित्य चोरून नेले आहेत. या संदर्भात पुजारी श्री. मयूर ताम्हणकर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, पहाटे पूजेला आलेल्या भाविकांच्या ही गोष्ट लक्षात आली. यानंतर त्यांनी मंदिराचे पुजारी आणि पोलीस यांना तात्काळ कल्पना दिली. पोलिसांच्या पथकाने चोरीचा पंचनामा केला आहे. काही वर्षांपूर्वी मिरज येथील प्रसिद्ध अंबामाता मंदिरात झालेल्या चोरीचा छडाही अद्याप लागलेला नाही. येथील श्री गणेशावर सांगलीकरांची विशेष श्रद्धा आहे. चोरीच्या या प्रकारामुळे भाविकांत संतापाची लाट उसळली आहे. गेल्या काही मासांपासून सांगली शहरात व्यापार्यांची दुकाने, तसेच घरफोडी यांचेही प्रमाण वाढल्याने त्याविषयीही नागरिकांत असंतोष आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात