वर्धा : सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना आहेत; परंतु रुग्णालये योजना योग्य रीतीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. एकप्रकारे गरजू रुग्णांवर अन्याय होत आहे. शासनाने या धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन आणि दुर्बल घटकांना दिल्या जाणार्या उपचारांची गुणवत्ता, उपचार करतांना येणार्या अडचणी, उपचारांसाठी आकारण्यात येणारे शुल्क, औषधांचे दर, तसेच योजनेसाठी खाटा राखीव ठेवण्यात येतात का, याची तपासणी करून नियंत्रण ठेवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली; मात्र समितीने अहवाल शासनाला सादर केला नाही ? अशी निष्क्रिय समिती काय कामाची, असा प्रश्न करत समिती बरखास्त करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते श्री. पद्माकर नानोटे आणि श्री. अतुल शेंडे, तसेच वर्धा गोरक्षक समितीचे सदस्य श्री. पवन गोहत्रे यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार श्री. निवृत्ती उईके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी आणि चंद्रपूर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. सचिन कलंत्रे यांना निवेदन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात