Menu Close

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांना संघटित होऊन कृतीशील व्हावे लागणार ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आमोणा (साखळी) येथील हिंदु धर्मजागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमोणा : मनुष्याच्या जीवनात नामस्मरण करणे, साधना करणे आणि धर्माचरण करणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांना संघटित होऊन यासाठी कृतीशील व्हावे लागणार आहे. तीच काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीने आमोणा, साखळी येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते मार्गदर्शन करत होते. या सभेला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पिंपळवाडा, आमोणा येथील श्री ब्रह्मेश्‍वर सभागृहात झालेल्या या सभेला ३२५ हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. या धर्मजागृती सभेत हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनीही मार्गदर्शन केले.

सभेच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीची ओळख श्री. पंकज बर्वे यांनी करून दिली. सभेचे सूत्रसंचालन कु. अपर्णा गावस, श्री. पंकज बर्वे आणि सौ. साधना जोशी यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. साईश आमोणकर यांनी केले.

श्री. अभय वर्तक पुढे म्हणाले, अंनिसचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या निरिश्‍वरवादी लोकांनी सनातन संस्थेचे नाव कलंकित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मडगाव येथील स्फोट प्रकरणी राजकीय षड्यंत्रापायी सनातन संस्थेला गोवण्याचा प्रयत्न झाला. ईश्‍वरी अधिष्ठान लाभलेली आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध असलेली सनातन संस्था या अपप्रचारांना कधीही बळी पडली नाही. धर्मजागृती सभेच्या शेवटी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. सभेमध्ये समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिकेही सादर केली.

क्षणचित्र

सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीला धर्माभिमानी हिंदूंनी चांगला प्रतिसाद दर्शवला. त्यांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

सरकारला हिंदूंच्या मतांची किमंत आहे का ? – हिंदु जनजागृती समितीचे सत्यविजय नाईक

राज्य निवडणूक आयोगाने फोंडा नगरपालिकेची निवडणूक घोषित केल्यावर त्या दिवशी फोंडा येथे ख्रिस्त्यांचा धार्मिक सण असल्याचे कारण पुढे करून अनेक लोकप्रतिनिधींनी निवडणुकीचा दिनांक पालटण्याची मागणी केली. त्यानुसार दिनांकात पालटही करण्यात आला. गतवर्षी विधानसभेची वाळपई आणि पणजी मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक ऐन चतुर्थीच्या काळात झाली होती. त्या वेळी हिंदूंनी पोटनिवडणुकीची दिनांक पालटण्याची मागणी केली होती; मात्र त्या वेळी हिंदूंच्या भावनांची कदर केली गेली नाही. अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केले जात असून त्यामुळे हिंदु धर्माची हानी होत आहे. हिंदूंना कायदे आणि अल्पसंख्याकांना फायदे, अशी स्थिती आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *