वणी येथील आंदोलनात हिंदु जनजागृती समितीची मागणी
वणी (यवतमाळ) : जम्मू-काश्मीरमधील सैनिकांवरील गुन्हे मागे घेऊन, राष्ट्रपती राजवट लागू करा, मदरशांना मिळणारे शासकीय अनुदान बंद करा, आक्षेपार्ह मदरशांवर तात्काळ बंदी घाला, कासगंज तिरंगा यात्रेवरील आक्रमकांवर देशद्रोही कायद्याच्या विरोधात कारवाई करा या मागण्यांसाठी २३ फेब्रुवारीला येथील तहसील चौकात राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले.
या वेळी काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक असल्याचे मत श्री. लहू खामणकर यांनी मांडले. या वेळी घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत २२५ जणांनी प्रशासनाला पाठवण्याच्या निवेदनावर स्वाक्षर्या केल्या. या वेळी रस्त्यावरील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात