दूरदर्शनच्या अधिकार्याला तात्काळ निलंबित करा ! – शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांची आंदोलनाद्वारे मागणी
‘सन बाथ’च्या नावाखाली बीभत्स प्रकार
पुणे : सिंहगडावर दूरदर्शन केंद्रातील लतीफ सय्यद हा धर्मांध अधिकारी सकाळी विवस्त्र होऊन उघड्यावर बसलेला आढळून आला. त्या वेळी काही शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी त्याला हटकल्यावर तो तेथून पळून गेला. या सर्व प्रकाराचे दुर्गप्रेमींनी भ्रमणभाषमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी अधिकार्याच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. अटक झाली त्या परिसरातून मद्याच्या बाटल्याही आढळल्या आहेत, असे प्रथम माहिती अहवालात म्हटले आहे. अशा अधिकार्याचे तात्काळ निलंबन व्हावे, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ, शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांनी कोथरूड येथील दूरदर्शन केंद्रासमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. त्यानंतर दूरदर्शनच्या पुणे केंद्राच्या निदेशक (अभियांत्रिकी) कल्पना गोखे यांना विविध दुर्गप्रेमी संघटनांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. ‘असे कुकृत्य करणार्या अधिकार्याचे निलंबन करू’, असे लेखी पत्र आम्हाला द्या, अशी मागणी दुर्गप्रेमींनी केली. यावर दूरदर्शन केंद्राने ‘अशी घटना पुन्हा होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो’ असे पत्र दिले. (घटना घडल्यानंतर दूरदर्शन केंद्राने संबंधित अधिकार्याच्या निलंबनाचे आदेश तात्काळ द्यायला हवे होते. तसे न करता ही घटना पुन्हा होणार नाही असे लिहून देणे, म्हणजे समस्त शिवप्रेमी, दुर्गप्रेमी यांच्या धार्मिक भावनांचा अवमानच ! सिंहगडाविषयी काडीमात्रही प्रेम आणि महत्त्व नसलेले अधिकारी प्रशासनात असल्याचे हे फलित ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अधिकार्याचे निलंबन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवप्रेमी-दुर्गप्रेमी यांनी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात