अकोला : विख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय तज्ञांच्या समितीची धर्मादाय रुग्णालयांच्या पडताळणीची कमालीची अनास्था, तसेच संबधित समितीकडून काम करून घेण्याची अथवा समितीचे सदस्य तातडीने पालटण्याची आवश्यकता याविषयी महाराष्ट्र राज्याचे आमदार डॉ. रणजीत पाटील, गृह राज्यमंत्री (शहरे), नगर विकास, विधी आणि न्याय विकास मंत्री यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या वेळी समितीने धर्मदाय रुग्णालयामध्ये होणारा भ्रष्टाचार, तसेच गरीब रुग्णांना उपचार घेतांना येणार्या अडचणी, उपचारांची गुणवत्ता, उपचारासांठी घेण्यात येणारे शुल्क यांविषयी त्यांना माहिती सांगितली.
आमदार पाटील यांनी निवेदनाची नोंद घेत जिल्हाधिकार्यांना याविषयी बैठक घेण्यासाठी लेखी स्वरूपात आपल्या स्वीय सचिवांना निर्देश दिले. त्यांनी स्थानिक धर्मदाय रुग्णालयाची नावेही या वेळी विचारली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात