निवेदनातील मागण्यांचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करू ! – जिल्हाधिकारी, यवतमाळ
यवतमाळ : होळीच्या संदर्भात ८ दिवसांपासून आमची मोहीम चालू आहे, तसेच निवेदनातील मागण्याचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करू’’ असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार यांनी दिले. हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २३ फेब्रुवारी या दिवशी होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी होळीनिमित्त होणार्या अपप्रकारांविषयी सविस्तर चर्चा कार्यकर्त्यांसमवेत केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार दिलीप राठोड (सामान्य प्रशासन) यांनाही या वेळी निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना बजरंग दलाचे श्री. योगिन तिवारी, सनातन संस्थेचे श्री. पांडुरंग पिल्लेवार, श्री. अनंत अट्रावलकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे मंगेश खांडेल आणि दत्तात्रय फोकमारे उपस्थित होते.
वणी (जिल्हा यवतमाळ) येथे निवेदन
वणी : येथील हिंदु जनजागृती समितीने २३ फेब्रुवारीला, होळी आणि रंगपंचमी निमित्ताने होणार्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाणे येथे निवेदन दिले. पोलीस-प्रशासनाने जागृत राहून कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्या अनुचित प्रकारांना आळा घाला ! – सांगली आणि शिरोळ येथे निवेदन
सांगली : होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तींचा मार्ग दाखवणारा उत्सव असतांना दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. या दिवशी अनेक अयोग्य प्रकार होत आहेत. तरी प्रशासनाने पोलिसांच्या वतीने गस्तीपथके सिद्ध करणे, विशेषत: महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या काळात सतर्क रहाणे, अपप्रकार करणार्या तरुणांना त्वरित कह्यात घेणे यांसह अन्य उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देण्यात आले. सांगली येथे हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी यांना, तर शिरोळ (जिल्हा शिरोळ) येथे हे निवेदन तहसीलदार श्री. दिनकर गुरव यांना देण्यात आले. या वेळी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जत येथे निवेदन !
जत (जिल्हा सांगली) : होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने जत येथे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक राजेश कांबळे आणि तहसीलदार श्री. अभिजित पाटील यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत सनातन प्रभातचे वाचक श्री. वसंतराव ठेंगणे उपस्थित होते.
होळी-रंगपंचमीत होणार्या अपप्रकारांना रोखण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी
मुंबई : मुंबई आणि पालघर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, पोलीस ठाणी तसेच प्रशासन यांना निवेदन देण्याला आहे. आतापर्यंत भांडुप येथील पराग शाळा, सह्याद्री शाळा, वांद्रे येथील चेतना महाविद्यालय, खेरवाडी पोलीस ठाणे, नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाणे, नालासोपारा (प.) पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले आहे.
पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद !
१. तुमचा उपक्रम चांगला आहे. अशा उपक्रमांमुळे आम्हाला सहकार्यच होत असून पोलिसांचा ताण कमी होण्यास साहाय्य होते. – श्री. पोळ, पोलीस, खारघर पोलीस ठाणे
२. चेतना महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी यासंदर्भात हिंदु जनजागृती समिती कार्यकर्त्यांना सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
नंदुरबार आणि धुळे येथे प्रशासकीय अधिकार्यांना निवेदने
नंदुरबार : होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्या अनुचित प्रकारांवर आळा घालण्याविषयी २७ फेब्रुवारी जिल्हाधिकारी सोा. डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी साहेब आणि पोलीस अधीक्षक सोा. संजय पाटील साहेब यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
होळीच्या काळात रासायनिक रंग वितरण करणार्यांवर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आश्वासन दिले.
धुळे : येथील उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी भारदे यांना होळीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्याविषयी निवेदन सादर करण्यात आले.
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा !
होळी या मंगलमय सणाचे होत असलेले विकृतीकरण थांबविण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘खडकवासला जलाशय रक्षण चळवळ’, जनप्रबोधन चळवळ राबवतांना हस्तपत्रके, धर्मशिक्षणवर्ग, सण उत्सवाप्रमाणे धर्मसत्संग, फलकप्रसिद्धी आदी माध्यमातून प्रबोधन केले जाते. त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना निवेदने दिली जातात.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातील मागण्या
होळीसारख्या पवित्र सणाच्या अनुषंगाने अश्लील शिव्या देणे, मद्य पिऊन धिंगाणा घालणे, नास्तिकवादी संघटनांनी धर्मशास्त्रविरोधी उपक्रम राबवणे, ‘रेव्ह पार्टी’सारखे कार्यक्रम आयोजित करणे, स्त्रियांच्या अंगावर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, त्यांना पाहून अश्लील हावभाव करणे, घाणेरड्या पाण्याचे अन् आरोग्यास घातक रासायनिक रंग वापरणे यांसारख्या घटना सर्रास घडतांना दिसतात. यामुळे सणांचे पावित्र्य नष्ट होत आहे. यावर उपाययोजना म्हणून उपरोक्त गोष्टींवर प्रतिबंध घालण्यासह पोलीस गस्तीपथके वाढवणे, अपप्रकार करणार्यांना त्वरित कह्यात घेण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाद्वारे खालील अपप्रकारांना रोखण्याची पोलीस आणि प्रशासन यांची मागणी
१. स्त्रियांना फुगे मारणे
२. येणार्या जाणार्यांकडून बळजोरीने पैसे वसूल करणे
३. घातक आणि प्रतिबंधित रासायनिक रंगाची विक्री करणे
४. अमली पदार्थांच्या सेवनासाठी ‘पार्ट्यांचे’ आयोजन करणे
५. धूम्रपान-मद्यपान करून धांगडधिंगा घालणे
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात