Menu Close

देवनिधीतील अपहार प्रकरणी संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट करून संबंधितांकडून तो पैसा वसूल करावा ! – अधिवक्ता प्रकाश सालसिंगीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

ठाणे येथे ‘श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’ची पत्रकार परिषद

अशी मागणी का करावी लागते ? सरकारच्या हे का लक्षात येत नाही कि सरकारमधीलच या भ्रष्टाचारात सहभागी आहेत ?, असे प्रश्‍न जनतेला पडल्यास चूक ते काय ? –  संपादक, दैनिक सनातन प्रभात

डावीकडून श्री. सतीश कोचरेकर, अधिवक्ता प्रकाश सालसिंगीकर, डॉ. उपेंद्र डहाके आणि श्री. अजय संभूस

ठाणे : प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिर हे समस्त गणेशभक्तांचे श्रद्धेचे स्थान आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातून गणेशभक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात. वर्ष २०१६ मध्ये श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या केलेल्या पडताळणीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांकडून अपहार केल्याचे उघड झाले आहे. या माजी विश्‍वस्तांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करून त्यांच्याकडून देवनिधी वसूल करा, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता प्रकाश सालसिंगीकर यांनी ‘श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’च्या वतीने ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. या वेळी भाजपचे कल्याण उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके, ‘श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’चे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर आणि या समितीचे समन्वयक श्री. अजय संभूस उपस्थित होते.

हिंदूंनी श्रद्धेने अर्पण केलेला पैसा हा हिंदूंच्या कार्यासाठी वापरायला हवा ! – डॉ. उपेंद्र डहाके

हिंदूंनी श्रद्धेने अर्पण केलेला पैसा हा हिंदूंच्या कार्यासाठी वापरायला हवा; मात्र हिंदूंनी मंदिरात श्रद्धेने अर्पण केलेला पैसा हा अन्य धर्मियांसाठी वापरला गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामुळे जनतेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून शासनाने यांची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट करून कठोर शासन करावे, अशी मागणी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत

प्रवीण नाईक हे धादांत खोटे बोलत आहेत ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती

प्रवीण नाईक हे धादांत खोटे बोलत आहेत. सकृतदर्शनी तरी माहितीच्या अधिकाराखाली मिळालेले पुरावे ‘श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’कडे उपलब्ध आहेत. नाईक यांच्या म्हणण्यानुसार जर ही देयके खोटी असतील, तर ती त्यांच्या नावे कशी प्रविष्ट केली गेली, याचा त्यांनी शोध घऊन संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केली आहे.

(म्हणे) ‘माझ्यावर आरोप लावल्यामुळे मला धक्का बसला !’- श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे माजी विश्‍वस्त प्रवीण नाईक

मला धक्का बसला आहे. अशा प्रकारचे आरोप माझ्यावर लावले जात आहे. खरे तर मी मिरज प्रवासासाठी स्वतःची गाडी वापरली होती. मी गोव्याला कोणत्याही हॉटेलमध्ये राहिले नव्हतो आणि कोणतेही देयक जोडले नाहीत. हा सगळा व्यवहार माझ्या डेबिट कार्डमधून केला आहे. त्यामुळे आंदोलकांना माझे आवाहन आहे की, त्यांनी ही देयके समोर ठेवावीत. असे न केल्यास त्यांनी माझी बिनशर्त क्षमा मागवी, असे वक्तव्य श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे माजी विश्‍वस्त प्रवीण नाईक यांनी केले आहे. ‘दैनिक मिड डे’मध्ये हे वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आले आहे.

देवनिधी वसूल केला नाही,  तर आम्ही तीव्र आंदोलन  छेडू ! – अजय संभूस

देवनिधीची लूट करणे, हे एक महापाप आहे. या वाममार्गी महापाप्यांना वक्रतुंड गणराया शिक्षा करीलच; पण मंदिरांचे सरकारीकरण केल्यामुळे चालू असलेली ही लूट हे शासनाचेही दायित्व आहे. शासनाने या भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई केली नाही आणि देवनिधी वसूल केला नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *