Menu Close

धर्मांधांनी अपहरण केलेली अल्पवयीन हिंदु मुलगी ९ मास धर्मांधांच्या कह्यात

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगालमध्ये हिंदू असुरक्षित ! सर्वत्रच्या हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

कोलकाता : कुर्बान अली आणि त्याचा मुलगा मिंटू शेख यांनी येथील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे ९ जून २०१७ या दिवशी अपहरण केले. तेव्हापासून म्हणजे ९ मास ही मुलगी कोलकाताच्या ‘गार्डन रीच’ क्षेत्रात या धर्मांधांच्या कह्यात आहे; मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करून ‘गार्डन रीच’ या संवेदनशील क्षेत्रातून मुलीची सुटका करण्यास बंगाल पोलिसांनी नकार दर्शवला आहे, असे वृत्त ‘संगबाद प्रतिदिन’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. (कायदा आणि सुव्यवस्थेचे दायित्व असलेले पोलीसच धर्मांधांना घाबरत असतील, तर हिंदूंचे रक्षण कसे होणार ? यावरून हिंदू संघटनाची आवश्यकता लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

पीडित मुलीच्या वडिलांनी स्थानिकांसह प्रथम ‘गार्डन रीच’ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी पोलिसांना मुलीचा पत्ताही सांगितला; मात्र पोलिसांनी मुलीची सुटका करण्यास नकार दर्शवला. मुलीच्या असाहाय्य वडिलांनी अखेर कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती देबांक्षु बसक यांनी कोलकाताच्या संयुक्त पोलीस आयुक्तांना या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *