पुणे : सिंहगडावर दूरदर्शन केंद्रात साहाय्यक अभियंता म्हणून काम करणारा धर्मांध लतीफ सय्यद हा २५ फेब्रुवारीला सकाळच्या वेळी इमारतीबाहेर मोकळ्या जागेत विवस्त्र बसलेला आढळून आला. याविषयी संतप्त शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांनी त्याला विचारणा करताच त्याने उडवाउडवीची उत्तरे देत ‘कोणी महिला नाहियेत ना, मग काय’ अशी विचारणा केल्याचे या घटनेविषयीच्या चलचित्रात स्पष्ट दिसतेे. त्यानंतरही अरेरावीची भाषा करत, तसेच शारीरिक व्याधीचे कारण देत धर्मांध अधिकारी तेथून पळून गेला. यानंतर शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. निर्वस्त्र बसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाचे पावित्र्य भंग करणार्या लतीफ याला दूरदर्शन केंद्राने निलंबित करायला हवे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. पराग गोखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
या प्रसिद्धीपत्रकात श्री. गोखले यांनी पुढे नमूद केले आहे की, गैरवर्तन, महिलांचा अवमान, गडकोटांसारख्या पवित्र ठिकाणी असे बीभत्स प्रकार करून समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतांना दूरदर्शन केंद्राने केवळ ‘हा प्रकार पुन्हा होणार नाही’, असे पत्र दिले. असे करणे म्हणजे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींच्या तोंडाला पाने पुसण्याचाच हा प्रकार आहे. त्या अधिकार्याकडून हे कुकृत्य वारंवार घडत असल्याचे प्रथम माहिती अहवालात नमूद करण्यात आले आहे. तरी नैतिक उत्तरदायित्व म्हणून दूरदर्शन केंद्राने संबंधित अधिकार्याच्या निलंबनाचे आदेश त्वरित काढून दुर्गप्रेमींच्या भावनांचा आदर राखावा. पोलीस प्रशासनानेही सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेवून घडलेल्या प्रकाराविषयी संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात