आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावानंतर पाकची कारवाई
सरकारने पाकच्या अशा वांझोट्या कारवाईवर विश्वास न ठेवता आतंकवादी हाफीज सईदसह पाकलाही नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलावीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफीज सईद याच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इंसानियत या आतंकवादी संघटनांवर पाकने बंदी घातल्यानंतरही त्यांची कार्यालये उघडपणे चालू होती. याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावरून आलेल्या दबावानंतर पाक सरकारने या दोन्ही संघटनांची अधिकोष (बँक) खाती गोठवली आहेत. (पाकला स्वतःहून या संघटनांवर काहीच कारवाई करायची नाही, हे यातून स्पष्ट होते ! आता केवळ जगाला दाखवण्यासाठी केलेली ही एक धूळफेक होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) दोन्ही संघटनांची सुमारे ७० खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये १ कोटी १० लाख पाकिस्तानी रुपये आहेत. (मोठ्या प्रमाणावर जिहादी आतंकवादी कारवाया करणार्या संघटना कधीतरी त्यांंच्या अधिकोष खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे ठेवतील का ? किंवा बंदी आल्यानंतर तरी ते त्यात ठेवतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
याव्यतिरिक्त ७० जणांच्या विरोधातील १४१ खटल्यांची माहिती मिळवण्यात आली आहे. तसेच या दोन्ही संघटनांची सर्व संपत्ती जप्त करण्याचाही आदेश प्रशासनाला देण्यात आला आहे. पाकच्या पंजाब आणि इस्लामाबाद प्रांतांच्या प्रशासनाकडून या दोन्ही संघटनांच्या संपत्तीमधील १७० रुग्णवाहिकाही जप्त करण्यात आल्या आहेत. (एकीकडे आतंकवादी कारवाया करायच्या आणि दुसरीकडे आपण मानवतावादी कार्य करतो असे जगाला दाखवण्यासाठी रुग्णवाहिका ठेवायच्या ही जिहादी आतंकवादी संघटनांची नवी कार्यपद्धत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तसेच या संघटनांची ४० संकेतस्थळेही बंद करण्यात आली आहेत. (अशी वरवरची कारवाई करून हाफीज सईद याच्या कारवाया थांबणार नाहीत, तर त्यासाठी पाकने हाफीज सईदसहित त्याच्या सर्व आतंकवाद्यांना पकडून फासावर लटकवले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात