पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सभेला अनुमती नाकारल्याचे प्रकरण !
चिकोडी : पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना बेळगाव जिल्हा बंदी यांसह सभा घेण्यास अनुमती नाकारण्यात आली आहेे. इतर सभांना विनाअट अनुमती देणार्या प्रशासनाने केवळ पू. भिडेगुरुजी यांच्याच सभेला का अनुमती नाकारली आहे ? यामुळे कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंंदुविरोधी धोरण राबवत असल्याचे स्पष्ट होते, असे श्रीरामसेनेचे तालुकाध्यक्ष श्री. विक्रम बनगे यांनी सांगितले. येथील सरकारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चिकोडीत गुरुवारी पू. भिडेगुरुजी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस किमान १० सहस्र हिंदु बांधव उपस्थित रहाणार होते; पण प्रशासनाने सभेसाठी अनुमती नाकारली. या संदर्भात दलित बांधवांशी चर्चा केल्यावर पू. भिडेगुरुजी यांना वगळून सभा घेण्याची मागणी केली. त्यामुळे कराडच्या मेघाताई कदम यांना वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात येणार होते; पण प्रशासनाने ऐनवेळी सभेलाच अनुमती नाकारली.
या वेळी श्रीराम सेनेचे जिल्हा सचिव बसवराज कल्याणी म्हणाले, ‘‘सरकार केवळ हिंदूंचे खच्चीकरण करत आहे.’’ या वेळी निंगाप्पा मोकळे, गिरीष गुरव यांसह अन्य उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात