हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून सेवा करणार्या हिंदुत्वनिष्ठांना एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेविषयी आलेले कटू अनुभव
कधी नव्हे एवढी हिंदू ऐक्याची आवश्यकता असतांना हिंदूंमध्ये दुही माजवू पहाणार्या अशा हिंदुत्वनिष्ठ संघटना देशभरातील हिंदूंचे संघटन कसे करणार ? अशा संघटनांकडून हिंदूंचे रक्षण कधीतरी होईल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
‘एका गावात एक हिंदुत्वनिष्ठ हे हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करतात. या शहरात १ वर्षापूर्वी समितीचा सत्संग होत असे. त्यात हे हिंदुत्वनिष्ठ यायचे आणि सेवाही करायचे. त्या वेळी एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन ‘सत्संगात जाऊ नका’, असे सांगायचे. त्यानंतर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावातील सत्संग बंद करण्यास लावला.
सध्या हे हिंदुत्वनिष्ठ अधिक सक्रीय होऊन समितीच्या माध्यमातून सेवा करत आहेत. ते समितीने आयोजित केलेल्या हिंदू अधिवेशनाला आले होते आणि त्यांच्या गावात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’च्या अंतर्गत निवेदन देण्यासही त्यांनी प्रारंभ केला आहे. त्यानंतर नुकतेच या हिंदुत्वनिष्ठांना त्यांच्या ओळखीच्या दोन व्यक्तींनी येऊन सांगितले, ‘‘२ धर्मांध तुमच्याविषयी चौकशी करत होते. तुम्हाला ते लक्ष्य करू पहात आहेत. त्यांच्याजवळ रोहिंग्या मुसलमानांविषयी तुम्ही दिलेल्या निवेदनाचे छायाचित्र होते. तुमच्यामुळे आम्हीसुद्धा त्यांचे लक्ष्य होणार आहोत. तुम्ही हे सर्व थांबवले नाही, तर हे धर्मांध तुम्हाला सोडणार नाहीत.’’ या हिंदुत्वनिष्ठांसह आणखी एक हिंदुत्वनिष्ठ समितीच्या माध्यमातून सेवा करतात. पहिल्या हिंदुत्वनिष्ठांना दोन व्यक्तींनी धर्मांधांविषयी सांगितल्यावर काही दिवसांनी दुसर्या हिंदुत्वनिष्ठांनाही त्यांच्या शेजार्याने सांगितले, ‘‘तुम्हाला २ धर्मांध शोधत होते. ते माझ्याजवळ तुमची चौकशी करत होते. त्यांच्याजवळ तुमचे छायाचित्र होते. मी त्यांना ‘मला माहिती नाही’, असे सांगितले.’’
वरील प्रसंगांनंतर या दोन्ही हिंदुत्वनिष्ठांच्या लक्षात आले की, हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून आम्ही सेवा करू नये; म्हणून त्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने अशी क्लृप्ती लढवली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात