Menu Close

जळगाव येथे आतंकवादी होण्यास नकार देणार्‍या हिंदु युवतीची धर्मांधांकडून निर्घृण हत्या !

‘लव्ह जिहाद’चे भयावह सत्य स्वरूप !

आणखी किती हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’च्या बळी पडल्यावर हिंदू जागे होणार आहेत ? हिंदूंनो, वेळीच जागे होऊन धर्मशिक्षण घ्या आणि संघटित होऊन स्वत:सह तुमच्या भगिनींचे रक्षण होण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

जळगाव : शहरातील रामानंदनगर परिसरातील महाविद्यालयीन हिंदु युवतीला दंगलग्रस्त कॉलनीतील धर्मांध तरुणाने पळवून नेले होते. या हिंदु युवतीचे धर्मांतर करून तिला आतंकवादी कृत्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र युवतीनेे या कृत्याला नकार दिल्याने तिची हत्या करून पुरावे नष्ट करण्यात आल्याच्या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात ९ धर्मांधाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

१. धर्मांध आरोपी शेख वसीम शेख अहमद याने एका हिंदु युवतीस प्रेमाच्या पाशात ओढत तिला पळवून नेले आणि मुंबई येथे धर्मांतर करून निकाह केला होता.

२. या कालावधीत युवतीच्या पालकांनी युवतीस संपर्क केला असता तिने ‘वसीम त्रास देत आहे, तसेच वसीम आणि त्याचे साथीदार मला आतंकवादी कृत्य करण्यास भाग पाडत आहेत’, असे सांगितले होते. (एवढ्या मोठ्या पुराव्याकडे पोलीस लक्ष देतील काय ? – संपादक)

३. त्यानंतर काही दिवसांनी तिचा भ्रमणभाषवरून संपर्क होणे बंद झाले. यासंदर्भात युवतीच्या पालकांनी वसीमच्या कुटुंबियांकडे चौकशी केली असता ‘आम्हाला यातील काहीच माहीत नाही,’ अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हिंदु युवतीच्या पालकांचा संशय बळावला होता.

४. त्यानंतर तिची हत्या झाल्याचे लक्षात आले.

५. हिंदु युवतीच्या पालकांना वसीम आणि त्याचे कुटुंबीय दाद देत नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. सुनावणीअंती न्यायालयाने धर्मांध आरोपीच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्याचे आदेश दिले.

६. या प्रकरणी वसीम शेख, शेख अहेमद शेख तुरान, सागराबी शेख अहेमद, इम्रान शेख अहेमद, शेख अब्दुल अजीज, साहील खान अयुब खान, सईद जमुल, काझी मोहमंद इस्लाम यांच्याविरुद्ध जळगाव येथे गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *