Menu Close

यावल (जळगाव) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

धर्मांधांकडून वारंवार हिंदूंवर आक्रमण व्हायला, हा पाकिस्तान आहे का ? हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी काही ना काही कारणे काढून हिंदूंवर आक्रमण करणे, हे धर्मांधांचे नेहमीचे षड्यंत्र आहे. यावरून हिंदूंनी स्वरक्षणासाठी प्रशिक्षण घेणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

जळगाव : येथील धर्मांधांच्या परिसरातून काही हिंदू होळीत जाळण्यासाठी लाकडाचा दांडा घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करत चालले होते. त्या वेळी धर्मांधांनी विनाकारण या हिंदूंवर आक्रमण केले. यामुळे शहरातील बुरुज चौक ते संभाजीपेठ येथील भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वरील घटनेनंतर या कालावधीत हिंदू आणि धर्मांध रस्त्यावर आल्यामुळे तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली. धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या दगडफेकीत ३ हिंदु तरुण घायाळ झाल्याचे समजते. (हिंदूंनो, किती दिवस धर्मांधांच्या हातून मार खायचा, हे एकदाचे ठरवून टाका ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यानंतर पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेतली. यात ९० टक्के धर्मांध उपस्थित होते, तर केवळ १० टक्के हिंदू उपस्थित होते. (हिंदूंनो, धर्मांधांकडून संघटितपणा कधी शिकणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या संदर्भात पोलिसांनी अद्यापपर्यंत कुणावरही गुन्हा प्रविष्ट केलेला नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *