Menu Close

शिवजयंती म्हणजे हिंदूंचा पुनर्जन्म घडवणारा दिवस ! – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : ज्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा अंधार दाटला होता, त्या वेळी या हिरव्या अंधाराला छेद देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचा पुनर्जन्म घडवला. शिवजयंती केवळ शिवजन्मापुरता मर्यादित नाही, तर हिंदूंचा पुनर्जन्म घडवणारा दिवस आहे, असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले. सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विमानतळाच्या अधिकार्‍यांकडून मेघडंबरी बसवण्याची सूचना काही वर्षांपूर्वी करूनही त्यावर मेघडंबरी बसण्यात आलेली नाही. याविषयी श्री. उद्धव ठाकरे यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. त्यांची मेघडंबरी बसवण्याची कुवत नसेल, तर शिवसेना मेघडंबरी बसवेल, असे या वेळी श्री. उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *