Menu Close

निवडणुकीत विद्वान आणि मूर्ख यांच्या मतांचे मूल्य एकच असणे, हेच लोकशाहीच्या पतनाचे कारण ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

एकडोंगी (कुशीनगर) येथे हिंदु युवा वाहिनीच्या ‘होलीमिलन’ कार्यक्रमात मार्गदर्शन

होलीमिलन कार्यक्रमात उपस्थित धर्माभिमानी हिंदू

एकडोंगी, कुशीनगर (उत्तरप्रदेश) : सण आनंदाने साजरे करायचे असतात; पण आज सर्वत्र अन्याय-अत्याचार-शोषण करणार्‍या लोकशाहीच्या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड रोष असल्याने सण आनंदाने साजरे होत नाहीत. वर्ष १९५२ पासून आजपर्यंत प्रत्येक निवडणूक विकास आणि दारिद्य्र-निर्मूलन या सूत्रांवर लढवली गेली; पण या ७ दशकांत रस्ते, वीज, पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधाही लोकांना मिळाल्या नाहीत; कारण लोकशाहीत विद्वान किंवा लोककल्याणाची तळमळ असणारे नव्हे, तर धनबल, बाहुबल, जातीय गणित आदी असणारे निवडणूक जिंकतात. त्यामुळे निवडणुकीत विद्वान आणि मूर्ख यांच्या मतांचे मूल्य एकच असणे, हेच लोकशाहीच्या पतनाचे कारण आहे. यास्तव आपण या वर्षी होलिकादेवीला साक्षी मानून हिंदु राष्ट्र स्थापण्याची प्रतिज्ञा करूया, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी होलीमिलन कार्यक्रमात केले.

हिंदु युवा वाहिनीचे जिल्हा संयोजक श्री. अजय गोपालराव शिशुजी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला १२५ हून अधिक जण उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश-बिहार समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी उपस्थितांना होळी धर्मशास्त्रानुसार साजरी करण्याचे महत्त्व सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


धर्माचे रक्षण करणे, हेही धर्माचरणच ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

धर्मप्रेमी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना उजवीकडून श्री. चेतन राजहंस आणि श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

कार्यक्रमात उपस्थित धर्माभिमानी हिंदू

सौंधी, महाराजगंज (उत्तरप्रदेश) : सुखाचे मूळ धर्माच्या आचरणात आहे, तसेच धर्माचे आचरण करण्यासह त्याचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे, हेही धर्माचरण ठरते. धर्म असे सांगतो की, मनुष्यजन्माची सार्थकता ईश्‍वरप्राप्तीमध्ये आहे; म्हणून आपण ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रतिदिन साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. येथील ग्रामस्थ श्री. कृष्णकुमार यादव यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश-बिहारचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी हेही उपस्थित होते.

या वेळी श्री. राजहंस यांनी ‘कुंकू लावणे, कुलदेवीची उपासना, ग्रामदेवतेेचे दर्शन, पितृपक्षात श्राद्धविधी करणे इत्यादी धर्माचरणाच्या कृती शिकवण्यासह मंदिरांचे रक्षण, लव्ह जिहादपासून हिंदु युवतींचे रक्षण, धर्मांतरापासून गरीब हिंदूंचे रक्षण आणि जिहादी आतंकवाद्यांपासून गावाचे रक्षण’, या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रवचनापूर्वी श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी समितीचे धर्मकार्य आणि कार्यातील ग्रामस्थांचा सहभाग याविषयी मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *