Menu Close

जबलपूर येथील डॉ. सुरेंद्रलाल साहू यांची सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सदिच्छा भेट !

डॉ. सुरेंद्रलाल साहू (उजवीकडे) यांच्याशी संवाद साधतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

डॉ. सुरेंद्रलाल साहू (उजवीकडे) यांच्याशी संवाद साधतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

जबलपूर (मध्यप्रदेश) : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरू (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी जबलपूरच्या दौर्‍यात येथील डॉ. सुरेंद्रलाल साहू यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी सद्गुरू (डॉ.) पिंगळे यांनी त्यांना समितीच्या कार्याविषयी अवगत केले. या समवेतच हिंदु धर्माचे महत्त्व वैज्ञानिक स्तरावर स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सादर करण्यात येणारे विविध शोधप्रबंध यांच्याविषयीची माहितीही दिली. या वेळी विश्‍वविद्यालयाच्या कार्यासंदर्भात डॉ. सुरेंद्रलाल साहू यांनी काही सूत्रे सुचवली.

डॉ. सुरेंद्रलाल साहू यांचा परिचय

डॉ. सुरेंद्रलाल साहू हे मुख्य चिकित्सा आणि आरोग्य अधिकारी पदावर मध्यप्रदेशातील नरसिंहपूर येथे कार्यरत होते. ते वयाच्या १५ व्या वर्षापासून काव्य रचना करत आहेत. त्यांचे दोन काव्यसंग्रहही प्रकाशित करण्यात आले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *