शिवनी (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने द्वितीय साधना शिबीर
शिवनी (मध्यप्रदेश) : आज लोकशाहीमध्ये पसरलेल्या अपप्रवृत्तींमुळे समाजाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. केवळ न्यायव्यवस्थेचा विचार केला, तर छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांच्या काळात ज्या कठोरपणे आणि तत्परतेने न्याय मिळत होता, तसे कुठेही दिसून येत नाही. अशा प्रकारे भारतात लोकशाहीच्या प्रत्येक व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा रामराज्यासारखे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील हिंदु सेवा परिषदेच्या वतीने दोन दिवसीय साधना शिबिराच्या समारोप सत्राला संबोधित करतांना ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु सेवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी, शहराध्यक्ष श्री. धनराज माना ठाकूर आणि प्रसार-प्रचार प्रमुख श्री. मुनेश माना ठाकूर उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समिती एक शक्तीच्या रूपात पुढे येऊन हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे ! – अतुल जेसवानी
हिंदु सेवा परिषदेची स्थापना होऊन केवळ २ वर्षे झाली होती. अशा स्थितीत आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन आणि आधार मिळाला. आई जशी तिच्या लहान मुलाला कुशीत घेते, तसे समितीने आम्हाला तिच्या कुशीत घेतले. आम्हालाच नाही, तर देशातील अनेक लहान लहान संघटनांना समितीने आपल्या कुशीत घेतले आहे. आज ही संघटना एक शक्तीच्या रूपात पुढे येत असून हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.
क्षणचित्र
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पू. नवनीत महाराज यांना ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतराचे डावपेच’ हे ग्रंथ भेट देऊन सन्मान केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात