चेन्नई : येथील सेंट जोसेफ वृद्धाश्रमात अनाथ वृद्धांवर होणार्या अत्याचाराच्या विरोधात श्री. आर्.डी. प्रभु यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत हिंदु मुन्नानी’ या संघटनेने कांचीपुरम् येथे नुकतीच निदर्शने केली. सरकारने या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनामध्ये श्रीराम युवा सेना, भारत हिंदु महासभा इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या.
चेन्नई येथे सेंट जोसेफ वृद्धाश्रम सुमारे १७ एकर भूमीत वसलेला आहे. यात अनुमाने अर्धा एकर भूमीत शवागृह आहे. या वृद्धाश्रमाचे प्रभारी फादर थॉमस हे येथील अनाथ वृद्धांवर अनन्वित अत्याचार करतात. त्यासाठी थॉमस यांनी वृद्धाश्रमातील सर्व कर्मचार्यांना लाच देऊन स्वतःच्या बाजूने करून घेतले आहे. शवागृहातील मृतदेहांचे अवयव आणि हाडे यांची चोरी करून ते विदेशात निर्यात केले जातात, असे म्हटले जाते. सेंट जोसेफ वृद्धाश्रमाच्या मालकीच्या एका व्हॅनमध्ये दोन वयोवृद्ध महिला होत्या. त्यांचा साहाय्यासाठीचा धावा ऐकून पोलिसांनी ही व्हॅन पकडली होती. त्या वाहनात पोलिसांना एक मृतदेह आढळला होता. (ख्रिस्त्यांची क्रूरता जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. कुठल्याच प्रसारमाध्यमाने हे वृत्त प्रसिद्ध केलेले नाही. (कथित आरोपांवरून हिंदूंना आतंकवादी ठरवणारी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे ख्रिस्त्यांच्या क्रूरतेकडे मात्र दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात