Menu Close

उत्तरप्रदेशातील रामापूर येथे अंगावर रंग पडल्यावरून धर्मांधांची हिंदूंवर दगडफेक

धर्मांधांचा उद्दामपणा जाणा ! हिंदूंना सर्वधर्मसमभाव शिकवणारे धर्मांधांच्या या उद्दामपणाविषयी गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

गोंडा (उत्तरप्रदेश) : कौडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामापूर येथे होळीच्या दिवशी अंगावर रंग पडल्यावरून धर्मांधांनी हिंदूंवर वीट आणि दगड यांचा मारा केला. यात अनेक हिंदू घायाळ झाले. त्यामुळे तणाव पसरला. पोलिसांनी वातावरण शांत केले. घायाळांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामापूर येथे २ मार्च या दिवशी सकाळी हिंदूंचा एक गट होळी खेळत गावात फिरत होता. त्या वेळी काही मुलांकडून रस्त्याने जाणार्‍या धर्मांध युवकांवर रंग उडाला. त्यानंतर काही वेळाने धर्मांधांनी एकत्र येऊन होळीच्या गटावर दगड-विटांचा मारा केला. त्यामुळे अनुमाने १२ जण घायाळ झाले. याविषयीची माहिती मिळताच मोठा जमाव एकत्र आल्याने गावात तणाव निर्माण झाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *