बौद्ध आणि मुसलमान यांच्यातील संघर्ष शिगेला
धर्मांधांकडून बौद्धांचे धर्मांतर आणि त्यांच्या पुरातन स्थळांची तोडफोड केली जात असल्याचा आरोप
- कुठे देशातील बहुसंख्य बौद्धांवरील अत्याचारांमुळे देशात आणीबाणी लागू करणारे श्रीलंका शासन, तर कुठे देशातील बहुसंख्य हिंदूंवर नित्याने अत्याचार होत असतांना हातावर हात ठेवून बसणारे भारत शासन !
- भारतात ‘बौद्ध-मुसलमान भाई भाई’, असे म्हणणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोलंबो : बौद्ध आणि मुसलमान यांच्यातील वाढलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका सरकारने १० दिवसांची आणीबाणी घोषित केली. कँडी या श्रीलंकेच्या मध्यवर्ती जिल्ह्यात झालेल्या दंगलीनंतर लगेचच आणीबाणीची घोषणा करण्यात आली.
गेल्या वर्षभरापासून या दोन्ही समाजांत मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाले आहे. मुसलमान समाज लोकांना इस्लाममध्ये धर्मांतरित होण्यासाठी बळजोरी करत असल्याचा आरोप काही प्रखर बौद्ध गटांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर मुसलमानांनी बौद्धांच्या पुरातन स्थळांची तोडफोड केल्याचाही आरोप या गटांनी केला आहे. म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुसलमानांनी श्रीलंकेत आश्रय घेतला आहे. यास अनेक राष्ट्रवादी बौद्धांनी विरोध दर्शवला होता. या विरोधातही काही राष्ट्र्रवादी बौद्ध गटांनी निदर्शने केली आहेत.
या आणीबाणीविषयी माहिती देतांना सरकारी प्रवक्ते दयासिरी जयशेखर म्हणाले, ‘‘देशात धार्मिक दंगली उसळू नयेत; म्हणून १० दिवसांसाठी आपत्कालीन आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. फेसबूकच्या माध्यमातून हिंसेला खतपाणी घालणार्यांवरदेखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे.’’
कँडी येथे ५ मार्चला बौद्ध आणि अल्पसंख्यांक मुसलमान यांच्यात दंगल उसळली. एका मुसलमान मालकाच्या दुकानाला जमावाने आग लावली. त्यानंतर या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेतच
श्रीलंकेसमवेत तिरंगी मालिका खेळण्यासाठी भारत आणि बांगलादेश यांचे संघ श्रीलंकेत दाखल झाले आहेत. तथापि आणीबाणीमुळे या तीन संघांतील सामने होणार कि नाहीत, हे स्पष्ट झालेले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात