मिरज येथे नायब तहसीलदारांना निवेदन
मिरज : गेल्या काही वर्षांपासून रंगपंचमीचे कारण पुढे करून अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे, तरी यांसह अन्य असे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने मिरज येथे नायब तहसीलदार व्ही.व्ही. पिलारे यांना देण्यात आले. या वेळी व्यापारी सेनेचे श्री. पंडितराव (तात्या) कराडे, हिंदु धर्माभिमानी श्री. विठ्ठल मुघळखोड, यांसह सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
सोलापूर : सध्या रंगपंचमीच्या दिवशीही अनेक अयोग्य प्रकार होत असल्याने अनुचित प्रकारांवर आळा घालण्यासाठी हिंदु जनजगृती समितीच्या वतीने येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले.
पुढील कृतींवर प्रतिबंध आणा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी
१. रंग खेळतांना ये-जा करणार्या नागरिकांना बळजोरीने रंग फासणे, तसेच स्त्रियांवर फुगे मारणे
२. मद्यपान-धुम्रपान करत धांगडधिंगा घालणे, अमली पदार्थांच्या सेवनासाठी ‘पार्ट्या’ आयोजित करणे
३. आरोग्याला घातक, तसेच प्रतिबंधित रासायनिक रंगाची विक्री करणे
रबाळे (नवी मुंबई) येथे पोलीस ठाण्यात निवेदन !
ऐरोली (नवी मुंबई) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रंगपंचमीच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी रबाळे पोलीस ठाण्यात रा.स्व. संघाचे राकेश शर्मा, दिनानाथ पावसकर, संजू पांडे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री समाधान साळुंखे, सुधाकर पाटील, अनंत बेहरे यांनी मिळून निवेदन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात