निवासी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन
कोल्हापूर : कारागृहातील वातावरण हे आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ तर असतेच, त्यासह आध्यात्मिकदृष्ट्या तमप्रधानही असते. असे असतांना भाविकांना विश्वासात न घेता मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी कोणाशीही चर्चा न करता कारागृहातील महिला कैद्यांकडून श्री महालक्ष्मी देवी मंदिरासाठी लागणारे प्रसादाचे लाडू बनवून घेण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद महिला कैद्यांकडून नको, तर देवीप्रती सेवाभाव असणार्या भक्तांकडून बनवून घ्या, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बर्गे यांना देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे आहे.
या वेळी बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी साळुंखे आणि शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, हिंदु एकताचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री ज्ञानेश्वर अस्वले, अक्षय वळके, शिवसेनेच्या युवा सेनेचे श्री. रणजित आयरेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मधुकर नाझरे, सुरेश घाटगे, शिवानंद स्वामी उपस्थित होते.
या वेळी करण्यात आलेल्या मागण्या……
१. मंदिर समितीने प्रसाद बनवण्याची सेवा कारागृहातील महिला कैद्यांना देऊ नये. त्याजागी सत्त्वगुणी भक्तांकडून सेवा म्हणून बनवून घ्यावा.
२. श्री महालक्ष्मी देवीवर श्रद्धा असणारे आणि शुचिर्भूततेचे सर्व नियम पाळून प्रसाद बनवण्याची सेवा करण्यास इच्छुक असणारे अनेक महिला बचत गट कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत. त्यांचाही विचार मंदिर व्यवस्थापनाने करावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात