मुंबई : भांडुप पश्चिम येथील सह्याद्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाने १ मार्च या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे हिंदु जनजागृती समितीचे व्याख्यान ठेवून होळी साजरी केली. समितीचे श्री. सचिन घाग यांनी होळी साजरी करण्यामागील धर्मशास्त्र सांगून मार्गदर्शन केले. या वेळी श्री. घाग म्हणाले की, सध्या होळी साजरी करतांना बलपूर्वक वर्गणी गोळा करणे, रासायनिक रंगाने होळी खेळणे, गटाराचे पाणी वापरणे, अंडी फेकून मारणे, महिलांची छेड काढणे, मद्यपान करून डीजेवर संगीत लावून नाचणे इत्यादी अपप्रकार होतांना दिसतात.अंनिसच्या भूलथापांना ओळखून त्यांच्या धर्मविरोधी मोहिमांमधील फोलपणा या वेळी दाखवून दिला.
या मार्गदर्शनाचा लाभ मंडळाच्या ३० धर्मप्रेमी कार्यकर्त्यांनी घेतला.
हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाविषयी आभार !
हिंदु जनजागृती समितीमुळे सह्याद्रीनगर गणेशोत्सव मित्र मंडळ विविध सण आणि उत्सव यांचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन कार्य करत आहे, त्याचे श्रेय त्यांनी हिंदु जनजागृती समितीला देऊन समितीच्या सहकार्याविषयी आभार मानले.
या वेळी श्री. सचिन घाग यांनी सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट्रचा भ्रष्टाचार आणि त्याविरोधात सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने केलेले कार्य यांची माहिती सांगितली. त्यावर सह्याद्री गणेशोत्सव मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सतीश गावकर यांनी ‘‘मंडळाच्या लेटर हेडवर निषेध पत्र लिहून शासनाला पाठवतो’’, असे सांगितले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धूलिवंदनाच्या दिवशी प्रथमोपचार वाहन पथकाची व्यवस्था
धूलिवंदनाच्या दिवशी रासायनिक रंग वापरल्याने, पाण्याच्या पिशव्या किंवा फुगे मारल्याने किंवा पाण्यात घसरून पडल्याने शारीरिक इजा होणे, तसेच रंगामुळे डोळ्यांना आणि त्वचेला इजा होण्याच्या घटना घडतात. अशा रुग्णांना तातडीने प्रथमोपचार मिळावा यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार वाहन पथक भांडुप पश्चिम विभागात २ मार्च या दिवशी फिरवण्यात आले होते.
क्षणचित्र
एका लहान मुलाला दुचाकीस्वाराने धडक दिली असता, प्रथमोपचार पथकाने त्या लहान मुलाला तत्परतेने पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात नेले. मुलाला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे आणि त्या दुचाकीस्वाराला चुकीची जाणीव करून दिल्याविषयी त्याच्या वडिलांनी समितीचे आभार मानले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात